
मुंबई- रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) प्रवाशांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 5 एप्रिलपासून 12 डब्यांच्या नॉन एसी लोकलमध्ये वाढ (increase) होणार आहे. पश्चिम रेल्वेवर 5 एप्रिल पासून 12 डब्यांच्या नॉन एसी लोकलमध्ये (Non AC Local train) वाढ रेल्वेने अतिरिक्त 12 डब्यांच्या नॉन-एसी लोकल फेऱ्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वाढ करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेने 11 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त सेवा 5 एप्रिलपासून लागू होतील. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या अतिरिक्त फेऱ्यांसह एकूण फेऱ्यांची संख्या 1383 वरून 1394 होईल. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
जलद लोकल बोरिवली व वांद्रे स्थानकांवर थांबणार नाहीत
नव्याने सुरू होणाऱ्या जलद लोकल सेवा बोरिवली आणि वांद्रे स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच सध्याच्या काही लोकल सेवांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात येणार आहे. या अतिरिक्त सेवा ५ एप्रिल २०२३ पासून धावणार आहे. त्यामुळे या नव्या अतिरिक्त सेवांसह एकूण सेवांची संख्या १३८३ वरून १३९४ पर्यत पोहचणार आहेत. उपनगरी विभागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी, पश्चिम रेल्वेने अकरा अतिरिक्त बारा नॉन-एसी लोकल फेऱ्या प्रायोगिक तत्त्वावर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन लोकल फेऱ्या
– सकाळी ९.४० गोरेगाव – चर्चगेट धीमी लोकल
– सकाळी १०.४२ विरार- दादर जलद लोकल
-सकाळी ११.५० गोरेगाव- चर्चगेट धीमी लोकल
– दुपारी १.५३ विरार-अंधेरी जलद लोकल
– दुपारी २.४७ विरार- बोरिवली जलद लोकल
डाऊन मार्गावरील लोकल सेवा
– सकाळी ८.३८ चर्चगेट- गोरेगाव धीमी लोकल
– सकाळी १०.५१ चर्चगेट- गोरेगाव धीमी लोकल
– दुपारी १२.०६ दादर- विरार जलद लोकल
-दुपारी २.०० अंधेरी- विरार जलद लोकल
-दुपारी ३.२३ बोरीवली-विरार जलद लोकल