Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेचे दाखले, जन्मनोंद, जमिनीच्या कागदपत्रांमुळे अडचणीत असलेल्यांना दिलासा; ‘हिंदू वैश्य’चा ओबीसीत समावेश

जुन्या कागदपत्रांवर ‘हिंदू वैश्य’ अशी नोंद असल्याने ओबीसी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी आता दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने ‘हिंदू वैश्य’ या नोंदीचा स्पष्टपणे समावेश करून आदेश जारी केल्याने वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 12, 2026 | 04:02 PM
शाळेचे दाखले, जन्मनोंद, जमिनीच्या कागदपत्रांमुळे अडचणीत असलेल्यांना दिलासा; ‘हिंदू वैश्य’चा ओबीसीत समावेश

शाळेचे दाखले, जन्मनोंद, जमिनीच्या कागदपत्रांमुळे अडचणीत असलेल्यांना दिलासा; ‘हिंदू वैश्य’चा ओबीसीत समावेश

Follow Us
Follow Us:
  • हिंदू वैश्य नोंदीचा ओबीसी प्रवर्गातील समावेश स्पष्ट करणारा शासन
  • २००८ पासून सुरू असलेल्या वैश्य वाणी समाजाला यश
  • शिक्षण, नोकरी आणि राजकीय आरक्षणासाठी फायदा होणार 
सिंधुदुर्ग: जुन्या कागदपत्रांवर ‘हिंदू वैश्य’ अशी नोंद असल्याने ओबीसी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) मिळविताना येणाऱ्या अडचणी आता दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने ‘हिंदू वैश्य’ या नोंदीचा स्पष्टपणे समावेश करून आदेश जारी केला आहे. त्यामुळे वैश्य वाणी समाजातील बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून, या निर्णयाचे समाजाकडून स्वागत करण्यात आले आहे. या निर्णयाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य वाणी समाजाचे अध्यक्ष सुनील भोगटे यांनी राज्य शासनासह संबंधित लोकप्रतिनिधींचे आभार मानले.

२००८ पासून सुरू होता पाठपुरावा

कुडाळ एमआयडीसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुनील भोगटे यांनी या निर्णयाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्षा सुचित्रा भोगटे, पतसंस्थेचे संचालक ॲड. समीर वंजारी, उमेश वाळके, विजय भोगटे आदी उपस्थित होते. वैश्य वाणी समाजाला ओबीसी प्रवर्गातून वगळण्यात आल्यानंतर २००८ पासून समाजाच्या प्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. तत्कालीन समाजकल्याण मंत्री श्री. मोगे आणि तत्कालीन खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याने मंत्रालयात बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहणी करून अहवाल सादर केल्यानंतर २०११ च्या शासन निर्णयात अनुक्रमांक १९० वर ‘हिंदू वाणी’ आणि ‘हिंदू वैश्यवाणी’ यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला.

हेही वाचा: Yavatmal Accident News: यात्रेत अंगावर काटा आणणारी घटना;आकाश पाळण्यात केस अडकून चक्क डोक्याची चामडीच सोलली

‘हिंदू वैश्य’ नोंदीमुळे निर्माण होत होत्या अडचणी

मात्र, ‘हिंदू वैश्य’ या नोंदीचा स्पष्ट उल्लेख राहून गेल्याने समाजातील अनेक बांधवांना जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी मिळविताना अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः शाळेचे दाखले, जन्मनोंदी तसेच जमिनीच्या कागदपत्रांमध्ये ‘वैश्य’ किंवा ‘हिंदू वैश्य’ अशी नोंद असलेल्या व्यक्तींना या तांत्रिक अडचणीचा फटका बसत होता. त्यामुळे ‘हिंदू वैश्य’ या नोंदीचा स्पष्टपणे समावेश करण्याची मागणी समाजाकडून सातत्याने करण्यात येत होती.

मंत्रालयातील बैठकीनंतर अवघ्या दहा दिवसांत निर्णय

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी मंत्रालयात समाजकल्याण मंत्री अतुल सावे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला आ. किरण सामंत, आ. प्रमोद जठार, आ. अमल महाडिक, रत्नागिरीचे विकास शेठ्ये, लांजाचे प्रसन्न शेठ्ये तसेच सिंधुदुर्गातून सुनील भोगटे, ॲड. समीर वंजारी आणि उमेश वाळके उपस्थित होते. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने शासन निर्णय काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार अवघ्या दहा दिवसांत ‘हिंदू वैश्य’ या नोंदीचा समावेश करून शासनाने स्पष्ट आदेश जारी केल्याचे सुनील भोगटे यांनी सांगितले.

हेही वाचा: छत्रपती संभाजीनगर हादरले; लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याचा राग अनावर, मेडिकलमध्ये घुसून चालकावर चाकूने वार, अन्…

शिक्षण, नोकरी आणि राजकीय आरक्षणाचा फायदा

या निर्णयामुळे ‘हिंदू वाणी’, ‘हिंदू वैश्य’ आणि ‘हिंदू वैश्यवाणी’ या नोंदी असलेल्या तसेच १९६७ पूर्वीचा पुरावा जोडणाऱ्या समाजबांधवांना ओबीसी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे. याचा फायदा शैक्षणिक प्रवेश, शासकीय नोकरी तसेच राजकीय आरक्षणासाठी होणार असल्याचे भोगटे यांनी स्पष्ट केले. या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री उदय सामंत, समाजकल्याण मंत्री अतुल सावे, आ. प्रमोद जठार यांच्यासह समाजाच्या मागणीसाठी यापूर्वी सहकार्य करणारे तत्कालीन केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, आ. दीपक केसरकर आणि राजन तेली यांचे जाहीर आभार मानले.

Web Title: Relief for those facing difficulties due to school leaving certificates birth records and land documents hindu vaishya included in the obc category

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 04:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.