सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘ए आय’ मॉडेल याचा अभ्यास आता निती आयोग करणार आहे. हे मॉडेल देशपातळीवर राबवण्याविषयीही निती आयोग अभ्यास करणार आहे.
सिंधुदुर्ग येथे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना जोरदार टोला लगावला. त्यांनी म्हटले की, “ठाकरे ब्रँड कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.
कुडाळ-सांगिरडेवाडी येथील परब कुटुंबाचा गणराय यंदा ५२ दिवस विराजमान असणार आहे. परब कुटुंब दरवर्षी २१, २५, ४२ दिवस गणरायाची सेवा करतात. हा गणराय नवसाला पावणारा अशी ख्याती आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूर गावातील गावडे कुटुंबाचा “५२ चुलींचा गणपती” हा एक अद्वितीय आणि ऐतिहासिक गणेशोत्सव आहे. या परंपरेत ५२ कुटुंबे एकत्र येऊन ५२ पारंपरिक चुलींवर गणरायासाठी नैवेद्य तयार…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कालेली-बंगलेवाडी येथे गेली १५० वर्षांची परंपरा आजही कायम आहे. येथे ब्राह्मण आणि बहुजन समाजाचे गणपती एकाच माटवीखाली विराजमान होत असून, दोन्हींचे पूजन एकत्र केले जाते.
सिंधुदुर्ग जिल्हा हा सागर तटीय जिल्हा असून येथे मत्स्य व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षीत आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तांत्रिक दृष्टया प्रशिक्षीत आणि व्यावसायिक पदवीधरांसाठी महाविद्यालय होणे अत्यंत गरजेचे आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा वाहन चालक-मालक संघटनेची अधिकृत नोंदणी पूर्ण झाली असून जिल्ह्यातील वाहनचालक व मालकांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना कार्यरत होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा उच्छाद सुरू असून शेती, बागायतीचे मोठे नुकसान होत आहे. काही महिन्यांपूर्वी हत्तींच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.
जिल्ह्यात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानक आणि जिल्ह्यातील वेगवगेळ्या स्थानकांवर थांबा मिळावा यासाठी प्रवासी संघटनेचे रेल्वेस्थानकावर जनआंदोलन केले आहे.