sunday mega block on april 9 2023 mumbai local trains services will be affected on harbour and western line no block on central main line check the timmings nrvb
मुंबई : मध्य रेल्वेतर्फे (Central Railway) मुंबई विभागात (Mumbai Division) देखभाल आणि दुरूस्तीच्या कामांसाठी (Repair And Maintainence Work) मेनलाईनवर (Main Line) मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. तर (Harbour Line) हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर (Western Line) आज कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून (CSMT, Mumbai) सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४० या वेळेत धावणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार (Vidyavihar) स्थानकांदरम्यान भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबणाऱ्या डाऊन जलद (DN Fast) मार्गावर वळवण्यात येतील आणि पुढे डाऊन धीम्या (DN Slow) मार्गावर वळविण्यात येतील.
सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.