Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

रेल्वे मार्गावरील १८ स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. यापैकी १० प्रमुख ठिकाणांसाठी इ-लिलाव पूर्ण होऊन वैद्यकीय कक्ष सुरु होत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 17, 2026 | 06:20 PM
Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Follow Us
Follow Us:
  • गोल्डन अवरमध्ये होणार उपचार
  • १० प्रमुख ठिकाणांसाठी ई-लिलाव झाले पूर्ण
  • मध्य रेल्वेच्या १८ स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्ष
मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील १८ स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. यापैकी १० प्रमुख ठिकाणांसाठी इ-लिलाव पूर्ण होऊन वैद्यकीय कक्ष सुरु होत आहेत, तर उर्वरित ८ स्थानकांसाठी लवकरच लिलाव होणार आहे.

कक्षात प्रथमोपचार, ऑक्सिजन सपोर्ट आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असतील. वैद्यकीय कक्षांमुळे प्रवाशांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरुन दररोज सुमारे ३५ ते ३७ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवासादरम्यान अनेकदा प्रवाशांची तब्येत बिघडते.

 एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच,‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

जवळच्या अनेक रुग्णालयांशी मध्य रेल्वेचा करार

अपघातांमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. त्यामुळे रेल्वे स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेला दिले होते. ज्या दहा स्थानकांसाठी लिलावाची औपचारिकता यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. त्यात कळवा, टिटवाळा, कर्जत, कुर्ला, ठाणे, मुंब्रा, घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) यांचा समावेश आहे. याशिवाय जखमी प्रवाशांना त्वरित उपचार देण्यासाठी मध्य रेल्वेने जवळच्या अनेक रुग्णालयांशी करार केले आहेत.

आपत्कालीन सुविधा

  • प्राथमिक उपचार आणि प्राथमिक वैद्यकीय मदत
  • ऑक्सिजन सुविधा
  • स्ट्रेचर आणि मूलभूत लाइफ सपोर्ट उपकरणे
  • प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी

पुढील टप्प्यात ८ स्थानके

मध्य रेल्वेने कसारा, दादर, डोंबिवली, सायन, विक्रोळी, भांडुप, दिवा आणि इगतपुरी या आठ अतिरिक्त स्थानकांसाठी लवकरात लवकर ई-लिलाव करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मुख्य मार्ग आणि विस्तारित उपनगरीय विभागांमध्ये वैद्यकीय कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी ही स्थानके निवडली होती. यात लांब पल्ल्याच्या जंक्शन पॉइंट्सचा समावेश आहे, जिथे प्रवासी अनेकदा दीर्घ कालावधीसाठी वाट पाहतात.

दरम्यान, मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सातव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन एकूण १६ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यानंतर मध्य रेल्वेने कुर्ला-परळ पाचव्या आणि सहव्या मार्गादरम्यान सुमारे ५०० इमारती पाडण्याची कारवाई केली. परिणामी, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला गती मिळाली.

लोकल, मेल-एक्सप्रेसची वक्तशीरता वाढवण्यासाठी आणि लोकल सेवा सुधारण्यासाठी सीएसटी-कुर्ला ५व्या आणि ६व्या सहावी मार्गिका प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. जमीन अधिग्रहण, वसाहती पुनर्वसन, प्रशासकीय मान्यता आणि निधीची उपलब्धता यामुळे हा प्रकल्प रखडला. या प्रकल्पाचे काम जलद करण्यासाठी, तो दोन टप्प्यात विभागण्यात आला. कुर्ला ते परळ १०.१० किमी आणि परळ ते सीएसएमटी ७.४ किमी हे असे दोन थांबे होते. मात्र, भूसंपादनास विलंब झाल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Web Title: Medical treatment soon at 18 stations of central railway e auction process for emergency medical rooms relief for passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • central railway
  • Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
3

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.