Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इर्शाळवाडीत बचावकार्य थांबवले, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती; अजूनही 57 बेपत्ता 27 जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत आत्तापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 143 जणांना जिवंत बाहेर करण्यात यश आलय. दरम्यान, आता येथे  कालपासून (रविवार) बचावकार्य थाबवण्यात आलं आहे. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 24, 2023 | 06:46 AM
इर्शाळवाडीत बचावकार्य थांबवले, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती; अजूनही 57 बेपत्ता 27 जणांचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

खालापूर : इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर (Irshalwadi Landslide) बुधवारी, 19 जुलै रात्रीच्या सुमारास कोसळलेल्या दरड दुर्घटनेतील मृतांच्या संख्या आतापर्यंत 27 वर पोहोचली आहे. यामध्ये 57 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती दिली जात आहे. इर्शाळवाडीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 17 ते 18 घरांवर 15 फूट मातीचे ढिगारे कोसळलेले आहेत. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. ही वाडी अत्यंत दुर्गम ठिकाणी असल्यानं जेसीबी किंवा हेलिकॉप्टर या ठिकाणी पोहचू शकत नाही. त्यामुळे एनडीआरएफ आणि टीडीआरएफचे जवान भर पावसात आणि चिखलात श्वान पथकाच्या मदतीनं, हातानं हा मातीचा ढिगारा उपसत आहेत. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 143 जणांना जिवंत बाहेर करण्यात यश आलय. दरम्यान, आता येथे  कालपासून (रविवार) बचावकार्य थाबवण्यात आलं आहे. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. (Rescue work stopped in Irshalwadi, Guardian Minister Uday Samant informed; 57 still missing 27 dead)

बचावकार्य थांबवले…

इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 143 जणांना जिवंत बाहेर करण्यात यश आलय. दोन कुटूंब पूर्ण मयत आहेत. सरकारकडून वाचलेल्या ग्रामस्थांची तात्पुरत्या स्वरूपात कंटेनरमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या कंटनेरची अवस्था वाईट असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणण आहे. सरकार सिडकोच्या माध्यमातून ग्रामस्थाचं कायमस्वरूपी पुनर्वसन करणार आहे. चार दिवसाच्या बचाव कार्यानंतर आता हे काम थांबवत असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. एकूण 228 लोकसंख्या असलेल्या गावात 27 जणांचा मृत्यू झालाय तर 57 जण अद्याप बेपत्ता आहेत.

बचावकार्यात अनेक अडथळे…

दरम्यान, इर्शाळवाडी दुर्घटना बचाव कार्य कालपासून (रविवार) थांबवण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे शोधकार्यात प्रचंड अडचणी येत होत्या, यंत्रसामुग्रीची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. मोठ्या प्रमाणात चिखल, दगड आणि मोठमोठी झाडे सर्वत्र पसरल्याने मदतकार्य कठीण बनले. राष्ट्रीय आपत्ती कृतिदलाचे जवान, ‘एल अँड टी’चे कामगार, अपघातग्रस्त मदत पथक, स्थानिक तरुण, इर्शाळवाडीतील ग्रामस्थ आणि कोल्हापूर व्हाइट आर्मीचे जवान आदींनी मृतदेह व गाडल्या गेलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण यात अनेक अडथळे आले. दुर्घटना होऊन चार दिवस झाल्याने दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच येथे औषध फवरणी करण्यात आली आहे.

Web Title: Rescue work stopped in irshalwadi guardian minister uday samant informed fifty seven still missing twenty seven dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2023 | 06:46 AM

Topics:  

  • रायगड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.