सोलापूर : प्रशासकीय कामकाजासाठी भेटी देणाऱ्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे हार-तुरे, शाल-श्रीफळ देवून सत्कार स्वागत समारंभाला सीईओ दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी निर्बंध घातले आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषद विभाग प्रमुख गटविकास अधिकारी यांना आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील विविध कार्यालय, शाळा, आरोग्य केंद्र व इतर शासकीय विभागांना तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शासकीय अधिकारी प्रशासकीय कामकाजानिमित्त भेटी देत असतात. भेटी दरम्यान प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने तपासणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात. पण
कार्यक्रम ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांचे पुष्पहार, शाल-श्रीफळ देवून स्वागत करण्यामध्ये खूपच वेळ अर्थिक खर्चसुध्दा होत असतो.
स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खर्चाचा अतिरिक्त बोजा पडण्याची बाब निर्देशनास आल्याने हे सर्व टाळणेसाठी त्याच बरोबर भेटीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांचे कामकाज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हार-तुरे, शाल-श्रीफळ देवून स्वागत करण्या संदर्भात निर्बंध लावण्यात आल्याचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
पंचायत समिती ग्रामपंचायत / प्राथमिक आरोग्य केंद्र / शाळा / अंगणवाडी इत्यादी ठिकाणी कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने भेटी देणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांची (मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसह) हार-तुरे, शाळा-श्रीफळ यांनी सत्कार / स्वागत करु नये. या सत्कार स्वागत समारंभाचा वेळ आपल्या शासकीय कामकाजात घालवावा. विभागस्तरीय अधिकारी / लोकप्रतिनिधी यांचे स्वागत सत्कार समारंभ सुध्दा अत्यंत कमी वेळेत व कमो खर्चात घ्यावेत.
स्थानिक अधिकाऱ्यांची कुठल्याही प्रकारे पुष्णगुच्छ, हार-तुरे, श्रीफळ देवून सत्कार करणेत येवू नयेत
जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे नियम लागू राहतील. कार्यक्रमाचे / रितिरीवाज व इतर कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने आवश्यक करणेचे असेल तर वहया, शालोपयोगी साहित्य, बचत गटांनी निर्माण केलेले साहित्य किंवा वस्तु देवून अत्यंत कमी वेळेत स्वागत सत्कार करावेत.
अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत लोकप्रतिनिधी यांचेबाबतीत स्वागत समारंभ घेणेस हरकत नाही. तथापि वेळ व खर्चाचे नियोजन स्थानिक प्रशासनाने करावा. तालुका किंवा जिल्हास्तरीय अधिकारी शासकीय अधिकाऱ्यांनी कार्यालयास भेट दिल्यानंतर त्यांचे प्रशासकीय कामकाज व्यवस्थित व प्रभावी होईल यादृष्टीने नियोजन करावे. असे आदेशात नमुद करण्यात आले आहेत.