Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTO News: चॉईस नंबरमधून आरटीओ ‘मालामाल’; आरटीओ कार्यालयाची आकडेवारी, यंदा १५ कोटींची वाढ  

नवीन खरेदी केलेल्या वाहनाला आकर्षक तसेच लक्की नंबर मिळावा यासाठी अनेकजन प्रयत्न करतात. काही हौशी वाहन मालक चॉईस नंबरसाठी वाट्टेल तितका पैसाही मोजतात.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 04, 2025 | 02:21 PM
RTO News: चॉईस नंबरमधून आरटीओ ‘मालामाल’; आरटीओ कार्यालयाची आकडेवारी, यंदा १५ कोटींची वाढ  
Follow Us
Close
Follow Us:
पुणे:  वाहनांचा चॉईस नंबर मिळावा यासाठी अनेक व्हिआयपींकडून मागणी होत असते. अशाच चॉईस नंबरमधून पुणे आरटीओ मालामाल झाले असून, गेल्या वर्षात तब्बल ६० कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ कोटींची वाढ या चॉईस नंबरमुळे झाली आहे.

नवीन खरेदी केलेल्या वाहनाला आकर्षक तसेच लक्की नंबर मिळावा यासाठी अनेकजन प्रयत्न करतात. काही हौशी वाहन मालक चॉईस नंबरसाठी वाट्टेल तितका पैसाही मोजतात. परिवहन विभाग अशा नंबरसाठी पैशांची आकारणी करतो. काही ठरावीक रक्कम त्यासाठी आकरलेली असते. त्या रकमेचा धनादेश भरून तो आरटीओ कार्यालयात जमा करावा लागतो. नंतर तो नंबर संबंधीत वाहनधारकासाठी राखीव करून ठेवण्यात येतो. मात्र, एका नंबरसाठी दोन वाहनधारकांचे धनादेश आल्यास त्यातील सर्वाधिक रकमेच्या धनादेश धारकाला तो नंबर दिला जातो. यासाठी आरटीओ कार्यालयात लिलाव पद्धत देखील राबवत असते.

Pune News: मंगेशकर रुग्णालयाच्या बेफिकरीमुळे गर्भवतीचा मृत्यू; बावनकुळे म्हणाले, “… ही तर मुघलशाही”

आरटीओच्या चॉईस नंबर प्रक्रियेतून परिवहन विभागाला प्रचंड प्रमाणात महसूल प्राप्त होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २०२३ -२४ या वर्षभरात आरटीओ कार्यालयाला एकूण ४४ कोटी ७७ लाख १० हजार रुपये महसूल मिळाला.  यासाठी ५२ हजार ४७३ जणांनी अर्ज केले होते. तर, २०२४ – २५ म्हणजे यंदा यात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महसूल १५ कोटींनी वाढला असून ५० कोटी ३६ लाख ९२ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची नोंद आरटीओत आहे.

ऑनलाईन प्रक्रिया अन् शुल्क वाढ

चॉईस नंबर मिळविण्याची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन करण्यात आली आहे. वाहनधारकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने चॉईस नंबर मिळविता येतो. त्यात काही महिन्यांपुर्वी चॉईस नंबरसाठीचे शुल्क वाढविले होते. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा महसूल वाढला आहे. सद्यस्थितीत आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून ओटीपीच्या सहाय्याने वाहनधारकांना ऑनलाईन पेमेंट करून नंबर घेता येत आहे. यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही.

Pune News : रुग्णालयाची बेफिकरी अन् पैशामुळे गर्भवतीचा मृत्यू; शिवसैनिकांनी आंदोलन करत अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर

Web Title: Rto rich from choice number rto office statistics increase of 15 crores this year nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 02:21 PM

Topics:  

  • RTO Office

संबंधित बातम्या

स्कूलबसबाबत मोहिम; नियम मोडणाऱ्यांना दणका, चार महिन्यात लाखोंचा दंड वसूल
1

स्कूलबसबाबत मोहिम; नियम मोडणाऱ्यांना दणका, चार महिन्यात लाखोंचा दंड वसूल

महाराष्ट्रातील RTO Border Check Post कायमस्वरूपी बंद होणार? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच सांगितले
2

महाराष्ट्रातील RTO Border Check Post कायमस्वरूपी बंद होणार? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच सांगितले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.