कोल्हापूर : संकट आल्यावर पळून जाणे, लाचारी स्वीकारणे हे कागलच्या इतिहासात नाही,कागलने कधीही लाचारी स्वीकारली नाही, इथे तसा इतिहासही नाही,पण ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हसन मुश्रीफांना दिला आहे. ते कागलमध्ये बोलत होते. यचवेळी त्यांनी , तुम्ही समरजीत घाटगे याना निवडून द्या, ते फक्त आमदार राहणार नाहीत, त्यांना मोठी संधीही देऊ, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
मंगळावारी (03 सप्टेंबर) शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी कागलच्या गैबी चौकात शरद पवार यांची जंगी सभाही झाली. या सभेला संबोधित करताना त्यांनी हसन मुश्रीफांचा चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कागलचे हसन मुश्रीफ हेदेखील अजित पवार यांच्यासोबत महायुतीत सामील झाले. त्यानंतर कागलसह कोल्हापूरचेही राजकारण ढवळून निघाले होते. तर दुसरीकडे भाजपचे नेते समरजीत घाटगे हेदेखील अस्वस्थ होते. अखेर घाटगेंनीही शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय़ घेतला. कागलच्या गैबी चौकात शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.
हेदेखील वाचा: मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ऋजुता दिवेकरांनी सांगितलेले ‘हे’ उपाय नक्की करून पहा
यानंतर उपस्थित जनतेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, ” समरजीत घाटगेंनी निवडून द्या, कागलकरांच्या पाठिंब्यावर समरजीत घाटगेंना विधानसभेवर पाठवा. आमदार झाल्यानंतर समरजीत घाटगे फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांना काम कऱण्यासाठी मोठी संधीही देणार, गेल्या बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात हा विचार आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर समरजीत घाटगेंना मंत्रीपदाची संधी मिळेल, कागलमध्ये लाल दिव्याची परंपरा कायम राहण्याचे असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले. तसेच, कागलमध्ये एका व्यक्तीला आम्ही सर्वकाही दिले. पण ते संकटात आमची साथ सोडून निघून गेले. ईडीची धाड पडल्यानंतर ते अस्वस्थ झाले होते. पण त्यांना आता त्यांची जागा दाखवून द्यायची आहे.
हेदेखील वाचा: National Wildlife Day : राष्ट्रीय वन्यजीव दिनानिमित्ताने जाणून घ्या कोणती आहेत भारतातील टॉप 5 वन्यजीव अभयारण्ये
मोदी सरकार आणि राज्य सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, आज महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. दररोज या गोष्टींशी संबंधित बातम्या आहेत. लोक आता रस्त्यावर उतरत आहेत, निषेध करत आहेत, परंतु केंद्र सरकार आणि शिंदे सरकार गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणताही निर्णय घेत नाहीत. ज्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार त्यांच्या हातात पुन्हा महाराष्ट्र द्यायचा नाही, हा निर्णय आता आपल्याला घ्यावा लागेल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.