
Maharashtra Municipal Election 2026
Nashik Election 2026 : केलं एक घडलं भलतंच! EVM वर बटण दाबलं धनुष्याचं, लाईट पेटला कमळाचा
खैरे म्हणाले की, “माझी आई ९९ वर्षांची आहे, तिला चालता येत नाही. ती बसूनच सर्व काम करते. आमचा संपूर्ण परिवार येथे आहे आणि सर्व कुटुंबीयांसह मतदान केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची आठवण ठेवून हे मतदान करण्यात आले.” तसेच, ” प्रभाग पद्धतीमुळे काही मतदार गोंधळात पडत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र आता हळूहळू परिस्थिती रुळावर येत असल्याचे खैरे म्हणाले.
त्याचवेळी त्यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका निशाणा साधला. “तुम्हीच पराभूत झालेले आहात, बुडालेले आहात, म्हणूनच पैसे वाटप करता. आशिष शेलार लवकरच मुंबईतून तडीपार होतील. हे लोक पैसे देऊन मतदान करून घेत आहेत.”
छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी सुरू असलेल्या पैसे वाटपावरुनही त्यांनी निशाणा साधला. “नागरिकांना मदत म्हणून पैसे दिले जात नाहीत, तर मत विकत घेण्यासाठी पैसे दिले जात आहेत. भाजप आणि शिंदे गटातील काही लोक पैसे वाटप करत आहेत. प्रामाणिकपणे काम करा,” असा आरोप त्यांनी केला.
मतदानावेळी बोटाला लावलेल्या शाईबाबत बोलताना ते म्हणाले, “पेनाने शाई लावली तरी काही हरकत नाही. शाई वाळल्यानंतर ती पुसली जात नाही.” शेवटी त्यांनी शिरसाट यांच्यावर टीका करत म्हटले की, “मला शिरसाट यांनी तिळगुळही दिला नाही, फक्त घोषणा करतात. त्यांचे राजकीय नाटक सुरू आहे.”