बुलढाणा : भारत-पाकिस्तान संघर्ष आणि देशभक्तीच्या मुद्द्यांवरून शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी अनेक वादग्रस्त विधानं करत जोरदार घणाघात केला आहे. विशेषतः अभिनेत्री राखी सावंतविषयी केलेल्या वक्तव्यामुळे गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
“राखी सावंतसारख्या महिलांना देशद्रोही ठरवून गोळ्या घातल्या पाहिजेत. भारतात जन्म घेणं, इथे कमावणं आणि ऐशआरामात राहून विरोधी देशात जाऊन तिथला नारा देणं – हे सहन केलं जाणार नाही. अशा महिलांना भारतात परत येण्याची परवानगीही देता कामा नये. देशासाठी अशा लोकांना कायमचं तिकडेच गाडायला हवं.” अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अभिनेत्री राखी सावंतबाबत प्रतिक्रीया दिली आहे याचवेळी त्यांनी पाकव्याप्त कश्मीर आणि देशभक्तीच्या मुद्द्यावरून वादग्रस्त विधाने केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
“पीओकेचा खात्मा झाला पाहिजे. प्रत्येक भारतीयाची हीच भावना आहे. पीओके ताब्यात घेतल्याशिवाय आतंकवाद संपणार नाही. बलुचिस्तानही वेगळा करून तिथल्या मराठ्यांचा सन्मान राखायला हवा.” अस संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या कुरापतींवर बोलताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवणींना उजाळा देत गायकवाड म्हणाले की, “बाळासाहेब असते, तर देशातील प्रत्येक नागरिक युद्धासाठी सज्ज झाला असता. पाकिस्तानने अनेक निरपराध नागरिकांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे संताप सर्वसामान्यांच्या मनातही आहे.” असे ते म्हणाले.
संजय राऊतांवरही टीका
“संजय राऊतांची काय औकात आहे की ते दोन्ही देशांबद्दल चर्चा करतात? तिन्ही दल आणि पंतप्रधानांनी निर्णय घेतला असेल, तर त्यामागे काही व्यूहरचना असणारच. समर्थक देशांचा सल्ला मान्य करावा लागतोच.” अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
आठवडाभर व्यवस्थित टिकून राहील दह्यात वाफवलेली मिरची, नोट करून घ्या झणझणीत पदार्थ
पहलगाम हल्ला आणि युद्धविराम
पहल्गाम हल्ल्यावर बोलताना गायकवाड म्हणाले, “हल्ल्याचा बदला एका कारवाईने पूर्ण होत नाही. हल्लेखोर मिळाले नाहीत, तरी पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. जनतेची अपेक्षा निर्णायक युद्धाची होती. पंतप्रधानांनी पुढील रणनीती ठेवली असेल, पण सर्व पक्षांना देखील ही माहिती दिली पाहिजे.”
काय म्हणाली होती राखी सावंत?
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता.. केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना परतण्याचे आदेश दिले होते. अशा परिस्थितीत राखीने पाकिस्तानला समर्थन देत जय पाकिस्तानचे नारेही लावले.
व्हायरल व्हिडिओमध्ये राखी म्हणत आहे, “मी राखी सावंत आहे. मी खरे बोलेन, खोटे बोलणार नाही. पाकिस्तानच्या लोकांनो, मी तुमच्यासोबत आहे. जय पाकिस्तान!” यानंतर सोशल मीडियावर गदारोळ झाला. अनेक लोक त्याचे नागरिकत्व रद्द करण्याची आणि देशातून हद्दपार करण्याची मागणी करत आहेत.