Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथे ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोरोनानंतर वाढलेल्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवून विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 14, 2026 | 10:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील डोंगरशेवली गावाने विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाच्या मार्गावर आणण्यासाठी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हातात लहान वयात मोबाईल आले. शिक्षण सुरू राहिले, मात्र मोबाईल आणि दूरचित्रवाणीच्या अति वापरामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागल्याची तक्रार पालकांकडून वारंवार होत होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावातील शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी एकत्र येत ‘अभ्यासाचा भोंगा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली.

Kolhapur News : “जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणार” – मंत्री हसन मुश्रीफ

डोंगरशेवली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू झाला. केवळ घोषणा करून न थांबता त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य राहावे, घराघरांत शिस्तबद्ध वातावरण तयार व्हावे आणि मोबाईलचा वापर मर्यादित व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

दररोज सायंकाळी नेमक्या ७ वाजता गावात भोंगा वाजवला जातो. भोंगा वाजताच सर्व विद्यार्थी अभ्यासासाठी बसतात. विशेष म्हणजे सायंकाळी ७ ते ९ या दोन तासांच्या कालावधीत पालक स्वतःहून मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवतात. त्यामुळे संपूर्ण गावात अभ्यासासाठी पोषक आणि शांत वातावरण निर्माण होते. भोंगा वाजताच गावात पसरलेली शांतता आणि मुलांचा अभ्यासात असलेला सहभाग हे चित्र खरोखरच समाधानकारक असल्याचे मुख्याध्यापक अनिल लोखंडे यांनी सांगितले.

या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र सावळे यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षक आणि समिती सदस्य घरोघरी भेट देऊन विद्यार्थी अभ्यास करत आहेत की नाही, याची खात्री करतात. शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांनीही गृहभेटीत सहभाग घेत जबाबदारीची जाणीव दाखवली.

सिडको येथे झालेल्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये १६ विद्यार्थ्यांची निवड! प्रक्रियेत ‘या’ गोष्टींचा समावेश  

या संकल्पनेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. एका माजी विद्यार्थ्याने भोंग्यासाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदतही दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी दाखवलेली ही एकजूट नक्कीच अनुकरणीय ठरत आहे.

Web Title: Abhyascha bhonga an innovative initiative has been launched in buldhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 10:18 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?
1

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?

Washim: मतदार नोंदणीसाठी सहकार्य करा, तहसीलदार राजेंद्र पाटील यांचे आवाहन, विशेष मतदार सेवा अभियान
2

Washim: मतदार नोंदणीसाठी सहकार्य करा, तहसीलदार राजेंद्र पाटील यांचे आवाहन, विशेष मतदार सेवा अभियान

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले
3

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

Washim: ‘रीलस्टार’ तहसीलदारांची पथकाकडून झाडाझडती, रील प्रकरणासह संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची चौकशी; अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष
4

Washim: ‘रीलस्टार’ तहसीलदारांची पथकाकडून झाडाझडती, रील प्रकरणासह संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची चौकशी; अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.