महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेत्यांमध्ये शाब्दिक चमकम आता थेट मारहाणीपर्यंत पोहचली आहे. नेते विधीमंडळाच्या आवारातही फ्री स्टाईल हाणामारी करत असल्यामुळे राजकीय स्तराबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
गुन्हा दाखल झाला, तर मी सामोरा जाईन. गंभीर काहीच नाही. कुणी जखमी नाही. गंभीर मारहाण नाही. बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय का? सौम्य मारहाण आहे. माझ्यावर करप्शनचा गुन्हा दाखल झालाय का?
मुंबईतील आकाशवाणी आमदार अतिथीगृहाच्या कॅन्टीनमध्ये खराब डाळ आढळल्याने बुलढाण्यातील शिवसेना (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी ऑपरेटरला इतका जोरात मारहाण केली की तो जमिनीवर पडला.
आमदार निवासात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा कॅन्टीनमध्ये मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी बनियान आणि टॉवेल गुंडाळून त्या ठिकाणी मारहाण केली होती.
Sanjay Gaikwad canteen license cancelled : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना शिळे अन्न देणाऱ्या आमदार निवासमधील कॅन्टीनचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दांत समज दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे चर्चेत आले आहेत. संजय गायकवाड हे यांनी त्यांना मिळालेल्या निकृष्ट दर्जाच्या जेवणावरुन आकाशवाणी आमदार निवासामध्ये जोरदार धुमाकूळ घातला.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे जोरदार राडा झाला. आमदार गायकवाड यांनी मारहाण केल्यावर प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Gaikwad Controversial statement : मराठी भाषेवर ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महायुतीने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र शिंदे गटाच्या खासदारांची ही टीका करताना जीभ घसरली आहे.
संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून गंभीर…
माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावा लागेल. पोलिस काहीही करू शकत नाहीत. माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली कुठेही तपास झाला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
Sanjay Gaikwad on Maharashtra Police : महाराष्ट्रातील पोलिसांबाबत शिंदे गटाच्या नेत्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
AadityaThackeray in Disha Salian : दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. तर महायुतीच्या दोन नेत्यांनी त्यांची पाठराखण केली आहे.
राज्यामध्ये बीडच्या परिस्थितीवरुन राजकारण रंगले आहे. नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीका केली जात असून यावरुन आता राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत विधान केले होते. “देशात अनुकूल सामाजिक परिस्थिती निर्माण झाल्यावर आरक्षण रद्द करण्याचा विचार करता येऊ शकतो,” असं विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर…