Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Nirupam : “मिठी नदी सफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा हात”, संजय निरुपम यांचा आरोप

मिठी नदी घोटाळा प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाची आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरियाचीही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. याचदरम्यान आदित्य ठाकरेंची ही चौकशी करा अशी मागणी करण्यात येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 28, 2025 | 04:42 PM
"मिठी नदी सफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा हात", संजय निरुपम यांचा आरोप (फोटो सौजन्य-X)

"मिठी नदी सफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा हात", संजय निरुपम यांचा आरोप (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मिठी नदीतील साफसफाईच्या कथित घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात डिनोला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स जारी केलं होतं. त्यानुसार सकाळी 11 वाजता डिनो आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला. सायंकाळी 7:30 च्या सुमारास डिनो मुंबई पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडला. यानंतर आता मुंबईत नालेसफाई आणि मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामात ६५ कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी केली जात आहे. मात्र डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांची घनिष्ट मैत्री असून या प्रकरणी आदित्यची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

छत्रपती कारखान्याचे ठरले कारभारी! अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक तर उपाध्यक्षपदी कैलास गावडे

याप्रकरणी संजय निरुपम यांनी सांगितले की, गेल्या २० वर्षांत मिठी नदीच्या सफाईसाठी १२०० कोटींचा खर्च झाला आहे. अजूनही मिठी नदीची पूर्ण सफाई झालेली नाही. या प्रकरणात मोठा घोटाळा झाला असून प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने ‘एसआयटीची नियुक्ती केली आहे. या प्रकरणी पालिकेचे तीन अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन दलाल आणि दोन कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे. गेल्या २० वर्षात १८ कंत्राटदारांना मिठी नदी सफाईचे काम दिले होते. २००५ पासून २०२२ पर्यंत महापालिकेत उबाठाची सत्ता होती. त्यांच्या काळात मातोश्रीच्या परवानगीशिवाय कुणालाही मुंबईत कंत्राट मिळायचे नाही हे सर्वांना माहित आहे, असे निरुपम म्हणाले.

मिठी नदीतील नालेसफाईबाबत ६५ कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यात अभिनेता डिनो मोरिया यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. मिठी नदी नालेसफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा संबंध आहे, कारण डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे हे जवळचे मित्र आहेत. दिशा सालियन हत्या प्रकरणात सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबईतील ड्रग्जच्या व्यवसायात डिनो मोरिया बदनाम आहे, असा घणाघात निरुपम यांनी केला.

निरुपम पुढे म्हणाले की, मुंबईत सोमवारी झालेल्या अतिवृष्टीनंतर शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यावर उतरुन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली होती. मुंबईकरांना त्रास होऊ नये, याची काळजी उपमुख्यमंत्री शिंदे घेत होते, मात्र जेव्हा २००५ मध्ये मिठी नदीला पूर आला होता तेव्हा ठाकरे कुटुंब मुंबईच्या रस्त्यांवर फिरकले सुद्धा नाही. २६ जुलै २००५ मध्ये मुंबईत ९०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. त्यावेळी मुंबई तुंबली होती. त्यावेळी बाळासाहेबांना मातोश्रीवर सोडून उद्धव ठाकरे कुटुंबासह ताज हॉटेलमध्ये राहायला गेले होते, अशी टीका निरुपम यांनी केली.

ऑपरेशन सिंदूर फेल गेलं, असे वक्तव्य करणारे उबाठा गटाचे खासदार संजय राऊत पाकिस्तानची सुपारी घेऊन बोलत आहेत, अशी टीका निरुपम यांनी केली. भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरात ऑपरेशन सिंदूरची गौरव गाथा सांगत असताना राऊत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांची भाषा बोलत आहेत का, असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला.

ठाण्यात यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2025 ‘ अंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा केला सन्मान

Web Title: Sanjay nirupam on aditya thackeray also involved in the mithi river cleanup scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • Dino Morea
  • Mithi River
  • Mumbai Police
  • Sanjay Nirupam

संबंधित बातम्या

Delhi Bomb Blast प्रकरणात पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबईत थेट 3 जणांना…
1

Delhi Bomb Blast प्रकरणात पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबईत थेट 3 जणांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.