Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Census: साताऱ्यात आता पेपरलेस जनगणना! पहिल्या टप्प्यात १५ मे पर्यंत ‘स्व-नोंदणी’ करण्याची संधी

जनगणना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे. प्रारंभी १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. या ‘स्व-नोंदणी’ प्रक्रियेमुळे नागरिकांना घरबसल्या माहिती देण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 29, 2026 | 10:50 AM
सातारा जनगणना, Digital Census, Satara News, Digital India,

सातारा जनगणना, Digital Census, Satara News, Digital India,

Follow Us
Close
Follow Us:
  • यंदा पारंपरिक पद्धतीऐवजी पूर्णतः तंत्रज्ञानाधारित स्वरूपात राबवली जाणार
  • शहरातील लोकसंख्या, आर्थिक स्थिती, निवासव्यवस्था आणि मूलभूत सुविधांची सविस्तर माहिती
Satara News: सातारा शहरातील जनगणना यंदा पारंपरिक पद्धतीऐवजी पूर्णतः तंत्रज्ञानाधारित स्वरूपात राबवली जाणार असून, १ मे २०२६ पासून या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. मोबाईल अॅप व ऑनलाइन प्रणालीच्या मदतीने माहिती संकलन करण्यात येणार असल्याने प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार ही मोहीम हाती घेण्यात आली असून, शहरातील लोकसंख्या, आर्थिक स्थिती, निवासव्यवस्था आणि मूलभूत सुविधांची सविस्तर माहिती यावेळी संकलित केली जाणार आहे. या डेटाच्या आधारे आगामी काळातील विकासकामांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

Satara News: अध्यक्षांची कागदपत्रे तक्रारदाराच्या हाती! डॉ. प्रिया शिंदेंच्या वकिलांचा विरोध अमान्य; 

जनगणना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे. प्रारंभी १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. या ‘स्व-नोंदणी’ प्रक्रियेमुळे नागरिकांना घरबसल्या माहिती देण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जूनदरम्यान नियुक्त कर्मचारी घरभेटी देऊन माहितीची पडताळणी व पूर्तता करतील.

शहरातील २५ प्रभागांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असून, त्यासाठी जवळपास ३०० प्रगणक गट कार्यरत असतील. प्रत्येक गटाला ठराविक घरांची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्तीही करण्यात आली आहे.

Satara News : आझाद नगर येथील अतिक्रमणावर हातोडा; पालिकेची धडक मोहीम, कारवाई आणखी वाढणार

या उपक्रमासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना पूर्वतयारी म्हणून विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे, ज्यामुळे डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करता येईल. जनगणना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र ओळख क्रमांक दिला जाणार आहे, ज्याचा उपयोग विविध शासकीय कामांमध्ये होणार आहे. या सर्व प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी अचूक व सत्य माहिती देणे आवश्यक असून, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Satara digital census 2026 mobile app based survey to begin from may 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 10:50 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.