Satara News: अध्यक्षांची कागदपत्रे तक्रारदाराच्या हाती! डॉ. प्रिया शिंदेंच्या वकिलांचा विरोध अमान्य; १९ मे रोजी होणार पुढचा फैसला (Social Media)
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे या सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवून त्या आरक्षित असलेल्या ओबीसी महिला प्रवर्गाच्या कोठ्यामधून जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या आहेत. त्याबाबतची तक्रार संतोष साळुंखे यांनी दिली होती. या तक्रारीनंतर डॉ. शिंदे यांच्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे केली आहे. त्याची पहिली सुनावणी २८ एप्रिल रोजी जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे यांच्यासमोर पार पडली.
Satara News : आझाद नगर येथील अतिक्रमणावर हातोडा;
गलांडे यांच्यासमोर डॉ. प्रिया शिंदे यांच्या वकिलांनी संबंधित तक्रारदारांच्या अधिकारावर कोणत्याही प्रकाराची गदा आणलेली नसल्याने त्यांना हरकत घेण्याचा कोणताही अधिकार वा हक्क नाही. त्यांनी त्या आरक्षणातून निवडणूक लढवली गेली नाही. त्यावर तक्रारदार यांचे वकील अॅङ घोडके यांनी सर्वसामान्यांचा अधिकार म्हणून लोकशाहीमध्ये तक्रार दाखल करु शकतात. त्यामुळे हरकत घेण्याचा अधिकार आहे. तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने जे जे डाक्युमेंट जात पडताळणी समितीकडे सादर केले आहे त्याची नक्कल मिळावी अशी मागणी केली. डॉ. शिंदे यांच्या वकीलांनी त्यांच्या मागणीला विरोध करत कागदपत्रे देण्यात येवू नयेत असा युक्तीवाद केला. त्यावर समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे यांनी त्यांचा युक्तीवाद फेटाळून लावत कागदपत्रे देत पुढची सुनावणी १९ मे रोजी होणार आहे.
डॉ. प्रिया शिंदे या सातारा जिल्ह्यातील एक उदयोन्मुख राजकीय चेहरा म्हणून ओळखल्या जातात. त्या सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावर कार्यरत असून त्यांच्या निवडीमुळे राज्याच्या स्थानिक राजकारणात त्यांचे नाव चर्चेत आले आहे.
डॉ. प्रिया शिंदे यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवून विजय मिळवला आणि त्यानंतर ओबीसी महिला राखीव कोट्यातून जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांची राजकीय वाटचाल अधिक चर्चेत आली. त्यांच्या या निवडीवरून सध्या कायदेशीर वाद सुरू असून त्यांच्या जातप्रमाणपत्राबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषद सदस्य अपहरणनाट्य; महाबळेश्वर न्यायालयात सुनावणी
शैक्षणिक पार्श्वभूमी पाहता, त्या उच्चशिक्षित असून ‘डॉक्टर’ ही पदवी त्यांनी मिळवलेली आहे. स्थानिक पातळीवर सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाच्या मुद्द्यांवर काम केल्यामुळे त्यांची ओळख तयार झाली आहे.
सध्या सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे त्यांच्या अध्यक्षपदाचे भवितव्य ठरणार असून, सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.






