Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा सूत्रधार शोधा; अंनिसचा सरकारला इशारा

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त साताऱ्यात अंनिसने विविध उपक्रम घेत सरकारकडे निवेदन दिले. दाभोलकर हत्या प्रकरणातील कथित सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Aug 20, 2026 | 04:47 PM
Satara News : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा सूत्रधार शोधा; अंनिसचा सरकारला इशारा

Satara News : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा सूत्रधार शोधा; अंनिसचा सरकारला इशारा

Follow Us
Follow Us:
  • दाभोलकर हत्या प्रकरणातील सूत्रधारांचा शोध घेण्याची अंनिसची मागणी.
  • जादूटोणाविरोधी कायदा देशभर लागू करण्यासाठी केंद्राने पावले उचलावीत.
  • आरोपींच्या सुटकेविरोधात सीबीआयने उच्च न्यायालयात योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी.
 

सातारा : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त साताऱ्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन देऊन डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासातील प्रलंबित मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली असली, तरी या हत्येमागील सूत्रधारांचा शोध अद्याप लागलेला नसल्याचा दावा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे तपास यंत्रणांनी तपासाला अधिक गती देऊन सूत्रधारांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

जादूटोणाविरोधी कायद्याच्या धर्तीवर देशभरात कायदा लागू करावा

अंधश्रद्धा, जादूटोणा आणि त्यातून होणारे शोषण रोखण्यासाठी महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या धर्तीवर देशभरात कायदा लागू करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने याबाबत ठोस पावले उचलावीत, असे अंनिसने म्हटले.

Satara News: वेताळवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न; डिजिटल शाळा, सीसीटीव्ही आणि घरकुल योजनेच्या प्रस्तावांना प्राधान्य

दरम्यान, प्रकरणातील काही आरोपींच्या सुटकेसंदर्भातील न्यायालयीन निर्णयाला आव्हान देण्यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

समाजात निर्भयता, विवेकवाद रुजविण्याचा अंनिसच्या कार्यकर्त्यांचा निर्धार

डॉ. दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक सुधारणांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करत समाजात निर्भयता आणि विवेकवाद रुजविण्याचा निर्धार अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Satara Anti Encroachments Drive Shahupuri Chowk: सातारा नगरपालिकेचा शाहूपुरी चौकात हातोडा; २५ अतिक्रमणांवर फिरवला जेसीबी!

स्मृतिदिनानिमित्त साताऱ्यासह देशभरात व्याख्याने, ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ आणि विविध जनजागृती उपक्रम घेण्यात आले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना अंनिसच्या राज्य अध्यक्षा प्रा. प्रमोदिनी मंडपे, वंदना माने, उदय चव्हाण, संतोष भिलारकर, प्रकाश खटावकर, डॉ. प्रदीप झनकर, डॉ. दीपक माने, भगवान रणदिवे, रोहित घाडगे आदी उपस्थित होते.

Web Title: Satara dr narendra dabholkar murder mastermind anis demand government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • narendra dabholkar murder case

संबंधित बातम्या

Dr Narendra Dabholkar death anniversary: आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २० ऑगस्टचा इतिहास..
1

Dr Narendra Dabholkar death anniversary: आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २० ऑगस्टचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.