Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: चॉकलेट वाटप करत इंधन दरवाढीचा निषेध; युवक काँग्रेसचे पेट्रोल अनोखे आंदोलन

Petrol Price Hike: ९ दिवसांतील इंधन दरातील ही तिसरी दरवाढ आहे. चार दिवसांपूर्वी, १९ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी ९० पैशांनी प्रति लिटर वाढ करण्यात आली होती. १५ मे रोजी दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढही करण्यात आली.

  • By anuradha sagar
Updated On: May 23, 2026 | 12:24 PM
Satara News, Karad Update, Youth Congress, Petrol Price Hike,

Satara News, Karad Update, Youth Congress, Petrol Price Hike,

Follow Us
Follow Us:

Satara News: वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने गुरुवारी कराडमध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल पंपावर वाहनधारकांना ‘मेलोडी’ चॉकलेटचे वाटप करून ‘मेलोडी इतकी चॉकलेटी का आहे?’ या प्रसिद्ध जाहिरातीतील वाक्याचा संदर्भ घेत महागाईमुळे सामान्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली कडवट परिस्थिती आंदोलनातून अधोरेखित करण्यात आली.

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडत असून, महागाईने जनतेचे जगणे कठीण केले आहे. केंद्र सरकारने तातडीने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच केंद्राच्या धोरणांमुळे वाहतूक, शेती आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याचा आरोपही करण्यात आला.

OBC Caste Census: ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी कराड तहसीलवर धरणे आंदोलन; विविध संघटनांचा

या आंदोलनात सत्त्वशीला पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नूतन सातारा जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर, युवक काँग्रेस सातारा जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अमित जाधव, तालुकाध्यक्ष देवदास माने, समीर इनामदार, उदय जाधव, संग्राम पवार, रविंद्र बडेककर, प्रविण वेताळ, चैतन्य पाटील, दिग्विजय जमाले, शहानूर देसाई, उमर फारूक, खालीद पटेल, रविराज पाटील यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.  दिल्लीसह अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळीच्या जवळ पोहोचले आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतच राहिल्या, तर येत्या काळात लोकांना इंधनाचे आणखी महागडे दर सहन करावे लागू शकतात. दिल्लीत पेट्रोल ८७ पैशांनी महाग होऊन प्रति लिटर ९९.५१ रुपये झाले आहे. डिझेल ९१ पैशांनी महाग होऊन प्रति लिटर ९२.४९ रुपये झाले आहे.

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती

दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरातही प्रति किलो १ रुपयाने वाढ झाली आहे. या बदलामुळे, दिल्लीत आता सीएनजी ८१.०९ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होईल. गेल्या १० दिवसांतील ही तिसरी दरवाढ आहे. यापूर्वी, सरकारने १५ मे रोजी सीएनजीच्या दरात २ रुपयांनी आणि त्यानंतर १८ मे रोजी १ रुपयाने वाढ केली होती.

९ दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

९ दिवसांतील इंधन दरातील ही तिसरी दरवाढ आहे. चार दिवसांपूर्वी, १९ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी ९० पैशांनी प्रति लिटर वाढ करण्यात आली होती. १५ मे रोजी दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढही करण्यात आली.

 

 

Web Title: Satara news karad youth congress protest satara petrol diesel price hike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Petrol price hike
  • youth congress

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.