Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime News जावलीत गुंडगिरी अन् दहशत सहन करणार नाही; अंकुशबाबा कदमांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा

Satara News : पंचायत समिती सदस्य अतिष कदम यांच्यावरील पोलीस ठाण्यात झालेल्या हल्यातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच उषा उंबरकर यांच्यावरील झालेल्या अन्याया विरोधात आज मेढा येथे सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 07, 2026 | 02:45 PM
Satara News Javali Medha Protest, Ankushbaba Kadam Medha Speech, Atish Kadam Attack Satara,

Satara News Javali Medha Protest, Ankushbaba Kadam Medha Speech, Atish Kadam Attack Satara,

Follow Us
Follow Us:
  • मेढ्यात भव्य सर्वपक्षीय मोर्चा
  • शिवरायांच्या आदर्शावरून टीका
  • दहशत व गुंडगिरी उखडण्याचा इशारा
Satara News: जावली तालुक्याने तुम्हाला चार टर्म निवडून दिले, प्रेम दिले त्या जावलीमध्ये तुम्ही दशहत माजविण्याचे काम करत आहात. जावलीतील जनता हे कदापी सहन करणार नाही असे आवाहन करीत छत्रपतींच्या काळात शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावण्याची हिंम्मत केणाच्यात नव्हती. तुम्ही शिवरायांचे वंशज स्वतःला म्हणवता ना मग एक टक्का तरी त्यांचा आदर्श तुम्हा घ्यावा अशी अशी कळकळीची विनंती वाशी महानगर पालिकेचे नगरसेवक अंकुश बाबा कदम यांनी केली.

पंचायत समिती सदस्य अतिष कदम यांच्यावरील पोलीस ठाण्यात झालेल्या हल्यातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच उषा उंबरकर यांच्यावरील झालेल्या अन्याया विरोधात आज मेढा येथे सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला.

Farmer News : शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! सरकारकडून 2 मोठे निर्णय; तब्बल 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना होणार फायदा

या मोर्चा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बोलताना नगरसेवक अंकुशबाबा कदम पुढे म्हणाले की, अतिष कदमांच्या घरासमोर गुलाल उधळने आणि फटाके फोडणे, अरे त्यांच्या घरात दोन महिण्याचे बाळ असताना घरात फटाके जाईपर्यंत फटाके फोडताय एवढा कसला उन्माद, सत्तेचा माज आणि सत्तेची मस्ती पाहीजे असा सवाल करत ते म्हणाले, एका महिलेला उषा कुठ गेलीस, कोणत्या बिळात गेलीस असे म्हणणे म्हणजे हा सत्तेचा उन्माद झाला अशी टिका कदम यांनी केली.

रस्त्यांची कामे ओरबडून घ्यायची, ठेकेदार बनायचे, ठेके घ्यायचे त्यातून पैसा मिळवायचा आणि माज करायचा पण हा माज आम्ही उतवल्याशिवाय राहणार नाही असा दम यावेळी अंकुशबाबा कदम यांनी दिला. छत्रपतींना आम्ही माननारे आहोत पण तालुक्यात दहशत गुंडगिरी आता आम्ही सहन करणार नाही. जनता सुज्ञ आहे. परळी भागात एक वाल्मिक कराड तयार केलाय आणि जावलीत एक वाल्मिक कराड तयार केला पण जावलीतील जनता हे कदापी सहन करणार नाही. दुंद गावाला पाणी देणाऱ्यांना मंत्र्यांनी दम द्यायचा एवढी वाईट अवस्था आहे पण हा माज आम्ही उतविण्याचे काम करू असे ठणकावून कदम यांनी सांगितले.

Raigad News: अनेक महिन्यांची प्रतीक्षा संपणार! उरणमधील खोपटा पुलाचे काम अंतिम टप्प्यात, दिवाळीत सु

दुपारी वेण्णा चौका पासून निषेध मोर्चाला सुरुवात होऊन मेढा पोलीस ठाण्यावर नेण्यात आला. मेढा येथील मुख्य चौकात एकनाथ ओंबळेंसह प्रमुख मंडळींची भाषणे झाली. या मोर्चामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षाचे नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये एकनाथ ओंबळे, सुनिता ओंबळे, सुनिता दुंदळे, शिल्पा शिंद, मोहनराव शिंदे, सुरेश पार्टे, समीर गोळे, सचिन करंजेकर, सोनाली पवार, रणधीर गोरे, सचिन जवळ, नारायण शिंगटे, राम कदम आदी तालुक्यातील महिला पुरुष वर्ग या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी निवेदन स्विकारताना दोन जणांना अटक केली असल्याचे सांगुन तिसरा आरोपी आज रात्रीपर्यंत अटक करणार असल्याचे आश्वासन दिले.

दरम्यान यावेळी नेते एकनाथ ओंबळे म्हणाले जावळीकर शांत सयंमी आहेत.मात्र काहींना जावळीचा बिहार बनवायचा आहे.हे जावळीकर कदापि सहन करणार नाहीत.जिल्हा परिषद निवडणुकीत आपली जागा येथील जनतेने दाखवली आहे.

 

Web Title: Satara news massive all party protest march in medha over attack on atish kadam as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 02:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.