Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khandala Revenue Lok Adalat : खंडाळा तालुक्यात ५ ऑक्टोबर अन् ७ डिसेंबरला महसूल लोक अदालत; प्रलंबित दावे सुटणार!

Khandala Revenue Lok Adalat: महसुली दावे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा खर्च होतो.दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने प्रकरणांचा निपटारा झाल्यास पक्षकारांना जलदगतीने वादातून मार्ग काढण्याची संधी मिळते आणि अर्धन्यायिक यंत्रणेवरील प्रलंबित प्रकरणांचा भार कमी होण्यास मदत होते.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 02, 2026 | 05:01 PM
Khandala Revenue Lok Adalat :

Khandala Revenue Lok Adalat :

Follow Us
Follow Us:
  • १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ दरम्यान ‘महात्मा ज्योतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान’
  • खंडाळा तहसील व मंडलाधिकारी कार्यालयांत ५ ऑक्टोबर व ७ डिसेंबर २०२६ रोजी लोक अदालत
  • तहसीलदार रविराज जाधव यांनी दिली आयोजनाबाबतची अधिकृत माहिती
Khandala Revenue Lok Adalat :महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या दि.14 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यात दि. 1 सप्टेंबर 2026 ते दि. 31 मार्च 2027 या कालावधीत ‘महात्मा ज्योतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे अशी माहिती खंडाळा तहसीलदार रविराज जाधव यांनी दिली आहे.

महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे पक्षकारांच्या परस्पर संमतीने व तडजोडीने जलदगतीने निकाली काढणे,नागरिकांचा वेळ व खर्च वाचविणे तसेच महसूल न्यायालयांवरील प्रलंबित प्रकरणांचा भार कमी करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.या अभियानाच्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील व वाई उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा तालुक्यात दि. 5 ऑक्टोबर 2026 आणि दि.7 डिसेंबर 2026 रोजी खंडाळा तहसील कार्यालय तसेच तालुक्यातील संबंधित मंडलाधिकारी कार्यालयांमध्ये महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा

कोणत्या प्रकरणांचा समावेश?

या अभियानामध्ये महसूल विभागातील अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या विविध प्रकारच्या महसुली दावे व अपीलांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचेकडे प्रलंबित प्रकरणांचा समावेश असेल.

तडजोडीने प्रकरणांचा निपटारा

महसूल लोक अदालतीमध्ये दोन्ही पक्षकारांची परस्पर संमती आणि तडजोड झाल्यास प्रलंबित महसुली दावा अंतिमरित्या निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

ज्या अर्धन्यायिक न्यायालयात महसुली दावा प्रलंबित आहे,तेथे दोन्ही पक्षकार किंवा त्यांच्या वकिलांमार्फत शासन निर्णयासोबत दिलेल्या ‘प्रपत्र-अ’ मधील नमुन्यात तडजोडीसाठी अर्ज सादर करता येईल.

प्राप्त अर्जांची छाननी करून दोन्ही पक्षकारांची संमती निश्चित करण्यात येईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार दोन्ही पक्षांकडून कायदेशीर तडजोडनामा (Consent Terms) प्राप्त करून घेण्यात येईल. निश्चित केलेल्या महसूल लोक अदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने प्रलंबित दाव्यावर अंतिम आदेश पारित करून प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल.

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

 

नागरिकांनी काय करावे?

खंडाळा तालुक्यातील ज्या नागरिकांचे महसुली दावे किंवा अपील संबंधित अर्धन्यायिक न्यायालयात प्रलंबित आहेत आणि दोन्ही पक्षकारांना परस्पर संमतीने प्रकरण तडजोडीने निकाली काढण्याची इच्छा आहे, त्यांनी खंडाळा तहसील कार्यालय किंवा संबंधित मंडलाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

पक्षकारांनी पुढील माहिती व कागदपत्रांसह तडजोडीसाठी अर्ज सादर करावा—

– प्रलंबित महसुली दावा/अपील क्रमांक व वर्ष
– दोन्ही पक्षकारांची नावे व संपर्क क्रमांक
– संबंधित प्रकरणाची थोडक्यात माहिती
– आवश्यक महसुली कागदपत्रे
– वकीलामार्फत अर्ज असल्यास संबंधित वकिलांची माहिती
– दोन्ही पक्षकारांची तडजोडीसाठी स्पष्ट संमती
नागरिकांचा वेळ व खर्च वाचण्यास मदत

महसुली दावे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा खर्च होतो.दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने प्रकरणांचा निपटारा झाल्यास पक्षकारांना जलदगतीने वादातून मार्ग काढण्याची संधी मिळते आणि अर्धन्यायिक यंत्रणेवरील प्रलंबित प्रकरणांचा भार कमी होण्यास मदत होते.

नागरिकांना आवाहन

खंडाळा तालुक्यातील प्रलंबित महसुली प्रकरणांतील दोन्ही पक्षकारांनी परस्पर संमतीने तडजोड करून प्रकरण निकाली काढण्याची इच्छा असल्यास या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा.

नागरिकांनी तहसील कार्यालय, खंडाळा किंवा आपल्या कार्यक्षेत्रातील मंडळ अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक अर्ज व कागदपत्रांसह वेळेत कार्यवाही पूर्ण करावी.

‘तडजोडीतून जलद न्याय — नागरिकांचा वेळ व खर्चाची बचत’ या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या अभियानास खंडाळा तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार रविराज जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Web Title: Satarakhandala revenue lok adalat campaign october 5 december 7 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 05:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.