
Pune University, SPPU, Pune News, Education, Wi-Fi
विद्यापीठातील वाय-फाय सुविधा तसेच इंटरनेट सेवा गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे कोलमडल्याने विद्यार्थ्यांना संशोधन, शोधप्रबंध (Research Papers), ऑनलाइन फॉर्म आणि इतर तांत्रिक शैक्षणिक कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विद्यापीठ प्रशासन दरवर्षी इंटरनेट आणि डिजिटल पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शुल्कातून आणि करदात्यांच्या पैशातून खर्च होत असताना प्रत्यक्षात इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नसेल, तर या खर्चाची सखोल आर्थिक व प्रशासकीय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, वाय-फाय व इंटरनेट सुविधा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या आयटी सेलच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आयटी सेलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन व बीआयपी सुविधा दिल्या जात असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाच्या काळात ही यंत्रणा निष्क्रिय असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
आयटी सेलची कार्यक्षमता तपासून तो निष्क्रिय आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गरज भासल्यास आयटी सेलची जबाबदारी कॉम्प्युटर सायन्स किंवा अन्य सक्षम तांत्रिक विभागाकडे सोपवावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठ परिसरातील वाय-फाय व इंटरनेट सुविधा तातडीने, शक्यतो ४८ तासांत सुरू करावी; तसेच आयटी सेलच्या कामकाजाची चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करावी,
-सुरज गायकवाड, शहराध्यक्ष , रीपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, पुणे