होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय
पुणे : लहान वयातील विद्यार्थ्यांचे आरोग्य व इतर बाबी लक्षात घेता पहिली ते चौथीपर्यंतची सकाळची शाळा 9 वाजता किंवा त्यानंतर भरविण्यात यावी, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. मात्र, असे असतानाही काही शाळा विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. तसेच शासन आदेशाला न जुमानता सकाळची शाळा अद्यापही पूर्वीप्रमाणेच 7 किंवा 7.30 वाजता भरवत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
हेदेखील वाचा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती वेतन मिळणार माहितीये का? ‘हा’ आकडा एकदा पाहाच…
विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठल्यामुळे झोपेची कमतरता निर्माण होते. सकाळी लवकर शाळेत जायचे असल्याने विद्यार्थी नाश्ता न करताच शाळेत जातात. पावसाळा, हिवाळा या ऋतूत सकाळी उठल्यामुळे आजाराचा धोका वाढू शकतो. पावसाळ्यात तथा हिवाळ्यात सकाळी पाऊस, धुके यामुळे प्रवासात धोका निर्माण होऊ शकतो. पालक तथा विद्यार्थ्यांची सकाळी शाळेच्या वेळी, विद्यार्थ्यांना तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे यासाठी मिळणाऱ्या कमी वेळामळे तारांबळ उडते.
मुलांच्या वयाचा तसेच आरोग्याचा व्यापक विचार करता शासन एखादा निर्णय घेते. ज्या शाळेत विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षण घेतात, त्या शाळा मात्र विद्यार्थी हिताकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. हा प्रकार निंदनीय आहे. शाळांनी शासन आदेशाचे तत्काळ पालन न केल्यास विद्यार्थी हितासाठी नक्कीच कायदेशीर लढा देण्यात येईल, असे पालकांचे म्हणणे आहे.
सकाळच्या सुमारास शाळेच्या वेळेबाबत ज्या शाळा शासन आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. बालवयातील विद्यार्थांचे आरोग्य, गैरसोय, प्रवास धोका, तसेच इतर काही बाबी लक्षात घेता वर्ग पहिली ते चौथीपर्यंत सकाळची शाळा ही 9 वाजता किंवा त्यानंतर भरविण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश आहेत. परंतु, अद्यापही काही शाळा मात्र सदर शासन आदेशाचे पालन करत नसल्याचे आढळून आले आहे.
याबाबत विद्यार्थी पालक संदीप गावंडे यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारणा केली असता त्यांना सक्षम कारण देता आले नाही. तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत अवगत केले असता शासन नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
हेदेखील वाचा : Devendra Fadnavis: वडिलांना तुरूंगात टाकताच सोडली शाळा? काय आहे देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ किस्सा