Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखरपुड्यात नवरीचे दागिने आणि रोकड पाहून दोघींची फिरली नियत; दोन ब्यूटीशियन महिलांनी केली चोरी, सीसीटीव्हीच्या आधारे दोघींना अटक

  • By युवराज भगत
Updated On: Aug 21, 2023 | 04:39 PM
साखरपुड्यात नवरीचे दागिने आणि रोकड पाहून दोघींची फिरली नियत; दोन ब्यूटीशियन महिलांनी केली चोरी, सीसीटीव्हीच्या आधारे दोघींना अटक
Follow Us
Close
Follow Us:
डोंबिवली : साखरपुड्याच्या कार्यक्रम सुरू असताना रूममध्ये असलेले दागिने आणि रोकड पाहून दोन ब्यूटीशियन तरुणींची नियत फिरली. दोघींनी नवरीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. मात्र, तिचे हे कृत्य तिसरा डोळा सीसीटीव्ही बघत होता. अखेर डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी कल्पना राठोड आणि अंकिता परब या दोन चोरट्या महिलांना अटक केली आहे. फक्त दागिने पाहून नियत फिरली त्यामुळे हे कृत्य केल्याचे त्या दोघींनी सांगितले आहे. या महिलेने या पूर्वीही अशा प्रकारचे कृत्य केले आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत.
२३ वर्षीय तरुणीचा साखरपुडा कार्यक्रमातील प्रकार
१५ ऑगस्ट रोजी मुलुंड येथे राहणाऱ्या पूजा गुप्ता या २३ वर्षीय तरुणीचा साखरपुडा होता. साखरपुडा कार्यक्रम सुरू असताना सर्व पाहुणे मंडळी डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल येथील सोनल हॉलमध्ये जमा झाले होते. कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात नवरदेव, पाहूणे व्यस्त असताना हॉलमधील ज्या रुममध्ये नवरीचे साहित्य ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी कोणी नव्हते.
नवरीचे दागिने आणि पैसे पाहून फिरली नियत
याच वेळी पूजा गुप्ताचा मेकअप करणारी कल्पना राठोड आणि अंकिता परब या दोघी रूममध्ये आल्या. पूजा गुप्ताची पर्स पाहून दोघींची नियत फिरली. कल्पना हिने पर्समधील दागिने काढून घेतले. तर अंकिता हिने पर्समधील रोकड चोरली. कार्यक्रमानंतर त्या दोघी निघून गेल्या. आपले दागिने हरविल्याचे पूजाच्या लक्षात येताच या प्रकरणात रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी योगेश सानप, प्रशांत सरनाईक, विशाल वाघ देविदास पोटे, आशा सूर्यवंशी यांच्या पथकाने तपास सुरु केला.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी केली अटक
हॉलमधील सीसीटीव्ही चेक करण्यात आला. सीसीटीव्हीत दिसून आले की, कल्पना आणि अंकिता या दोघी  पूजाच्या रुममध्ये ये-जा करीत होत्या. दोघींना ताब्यात घेऊन पोलिस तपास सुरु केला. आधी त्या दोघींनी  हे कृत्य केले नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी त्या दोघींना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी कबूली दिली. दागिने पाहून नियत फिरल्याने दागिने आणि रोकड चोरी केले असे सांगितले. यापैकी कल्पना ही मालाड येथे राहणारी असून अंकिता ही नालासोपारा येथे राहते.

Web Title: Seeing the brides jewelry and cash in the sugar bowl both of them changed their minds two beautician women committed theft nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2023 | 04:38 PM

Topics:  

  • Dombivli News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.