Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री, ग्राहकांची केली फसवणूक

फळांचा राजा म्हणून सगळीकडे आंब्याचे नाव घेतले जाते. सध्या सगळीकडे आंब्याचा रिझन चालू आहे. या सीझनमध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर आंबे बाजारात उपलब्ध होतात. गुढीपाडवा हा सण अवघ्या काही तासांवर आला आहे.मात्र बाजारामध्ये फळ विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2024 | 12:47 PM
कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री, ग्राहकांची केली फसवणूक
Follow Us
Close
Follow Us:

फळांचा राजा म्हणून सगळीकडे आंब्याचे नाव घेतले जाते. सध्या सगळीकडे आंब्याचा रिझन चालू आहे. या सीझनमध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर आंबे बाजारात उपलब्ध होतात. गुढीपाडवा हा सण अवघ्या काही तासांवर आला आहे.मात्र बाजारामध्ये फळ विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. ग्राहकांना हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंबा दिला जात आहे. कोकणातील हापूस आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे. देशासह विदेशात देखील हापूस आंब्याला मागणी आहे.

कोकणी हापूसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला बाजारात कोकणातील हापूस आंब्याला मोठी मागणी असते. मात्र बाजार समित्यांमध्ये ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंबा दिला जात आहे. बाजारामध्ये कोकणातील हापूसच्या आठ ते दहा हजार पेट्या, तर कर्नाटकमधील आंब्याच्या दोन ते तीन हजार पेट्यांची अवाक करण्यात आली आहे. बाजारामधील काही व्यापारी रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकत आहेत. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. ग्राहकांची सतत होणारी फसवणूक थांबण्यासाठी तत्कालीन पणन संचालकांनी परिपत्रक काढत फसवणूक करणाऱ्‍या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये आंबा आला आहे. त्यामुळे मूळ जातीच्या आंब्याची विक्री होईल, याबाबत दक्षता घेण्यात यावी. बाजार समित्यांना बाजार आवारातील सर्व गाळेधारक अडत्या, व्यापारी, हुंडेकरी यांना याबाबतच्या सक्त सूचना देण्यात याव्या. तसेच ग्राहकांकडून तक्रार दाखल झाल्यास संबंधितांवर बाजार समितीचे मंजूर उपविधीतील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये म्हंटले आहे.

बाजार समितीमध्ये हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. ग्राहकांची फसवणूक करणारे व्यापारी हे मुख्यता परप्रांतीय आहेत. आंब्याच्या हंगामात अडते आणि विभागप्रमुख, गटप्रमुखांच्या साटेलोट्यामुळे कारवाई केली जात नसल्याचे सांगण्यात आले आहे. कोकणातल्या हापूस आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे. मात्र ग्राहकांची व्यापाऱ्यांकडून मोठी फसवणूक केली जात आहे.

Web Title: Selling karnataka mangoes in the name of hapus mangoes from konkan cheating consumers kokan hapus mango

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2024 | 12:47 PM

Topics:  

  • Hapus
  • kokan

संबंधित बातम्या

Ratnagiri News: कोकणच्या राजावर गुजरातचा दावा? ‘या’ एका निर्णयामुळे आंबाबागायतदारांची चिंता वाढणार
1

Ratnagiri News: कोकणच्या राजावर गुजरातचा दावा? ‘या’ एका निर्णयामुळे आंबाबागायतदारांची चिंता वाढणार

Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध
2

Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

कोकणी पारंपरिक चवीची खापरोळी खाताच मन होईल तृप्त! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा चविष्ट पदार्थ
3

कोकणी पारंपरिक चवीची खापरोळी खाताच मन होईल तृप्त! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा चविष्ट पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.