रक्ताच्या उलट्या झाल्याने बर्फ गोळा विक्रेत्याचा मृत्यू; सांगलीतील धक्कादायक घटना
सेनगाव : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरात विजेचा शॉक लागून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षपणामुळे व निष्काळजीपणामुळे वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना सेनगाव शहरात घडली होती. आता या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी विद्युत वितरण कंपनीच्या प्रभारी उपअभियत्यासह तिघांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेनगाव येथील विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार कायम असून, सतत विद्युत दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचे बोगस कामे करून शासनाचा लाखोचा निधी लाटला असल्याचा आरोप नागरिकांतून व्यक्त होत आहे. तर सेनगावात विद्युत कंपनीचे दुरुस्तीच्या नावाखाली सतत होणारे काम अतिशय निकृष्ट व बोगस होत आहे. त्यामुळे सेनगाव शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विद्युत शॉक लागून अनेकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची मालिका सातत्याने घडत आहे.
यास केवळ विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरात ७ डिसेंबर रोजी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास कवठा येथील पठाण हे आपल्या मुलाच्या ऑटोमोबाईल दुकानासमोर थांबले असता अचानक त्यांच्या दुकानावरून गेलेला विद्युत तार ज्याची क्षमता अत्यंत तीव्र होती ही तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. त्यामुळे ते गंभीरित्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, विद्युत वितरण कंपनीच्या बेजबाबदार व निष्काळजीपणा करणाऱ्या व मृत्यूस कारणीभूत ठरल्याची फिर्याद मयताचा मुलगा मुक्तार पठाण याने दिली. या फिर्यादीवरून सेनगाव ग्रामीणचे सहाय्यक अभियंता सत्यनारायण वडगावकर व अभियंता राजेश जांभुळे यासह शहर लाईनमन दत्ता अंभोरे सर्व विद्युत वितरण कंपनी कार्यालय सेनगाव यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
दुरुस्तीची बोगस कामे
सेनगाव शहरासह तालुक्यात विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार चालत असून, या कंपनी अंतर्गत विद्युत वितरण दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दरवर्षी कामे केली जात आहेत. या बोगस कामामुळे अनेक निष्पाप तरुण व वृद्धांना आपला जीव गमवावा लागत आहे. विद्युत वितरण कंपनीमधील असलेले भ्रष्टाचारी व टक्केवारी धोरण जबाबदार असल्याच्या सुद्धा चर्चेला जात असून या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकारी कधी लक्ष देणार? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.