सांगली: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून राजकारण तापलं असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आक्षणाबाबत मोठे विधान केले आहे. “मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधेयकात दुरूस्ती करावी, आपण सरकारच्या बाजूने राहू, 50 टकक्यांपेक्षा जास्त आरक्षणावर जाता येत नाही. पण त्याच्यावर जायचे असेल तर कायद्यात बदल करावा लागतो. दुरुस्ती करायाला काही हरकत नाही.” असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, 50 टक्के असलेलं आरक्षण 75 टक्क्यांवर जायला पाहिजे. तामिलनाडू मध्ये 78 टक्क्यांच्या वर आरक्षण जाते. मग महाराष्ट्रात 75 टक्क्यांच्या वर का जाऊ शकत नाही. 75टक्क्यांच्या वर आरक्षण गेल्यास सर्वांनाच आरक्षण मिळेल, त्यामुळे कोणताही वाद राहणार नाही. असही शरद पवार यांनी सांगितले.
हेही वाचा: संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात; गाडीच्या पुढच्या भाग झाला चक्काचूर
यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरही निशाणा साधला. “राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे स्वागत आहे. पण तेवढ्यात भागणार नाही. मुलींवर वाढलेले अत्याचार गंभीर आहे. एकीकडे लाडल्या बहिणींना साहाय्य करण्याची भूमिका पण दुसरीकडे मुलींवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करायचे सुरू आहे. लाडकी बहीण योजनेमुळे अतर योजनांचे अर्थसाहाय्य थांबले आहे. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मिळणार शासकीय अर्थसाहाय्य थाबवण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्राचे उदाहरण आहे. अशा अनेक योजनांचे आर्थिक पैसे थांबवण्याच आलआहेत. असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
महाराष्ट्रात सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा राखला पाहिजे. अमित शाह सध्या काहीही बोलत आहेत. देशाचे गृहमंत्री भाषण काय करतात, तक शरद पवार, उद्धव ठाकरेंवर लक्ष ठेवा, त्यांचे पक्ष फोडा, असे सांगततात. पण त्याचवेळी ते ते कायदा व सुव्यवस्था बिघडते. ज्यांच्या हातात देशाची सुरक्षा आहे तेच नेते अशी भाषणे करत असतात. येत्या दीड महिन्यात याचा निकाल लागेल,” असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात 18 सभा घेतल्या पण 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाला,त्यामुळे पंतप्रधानांनी महाराष्ट्रात जास्त सभा घ्याव्यात अशीही आमची विनंती आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा: महिलांनो, लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार?; काँग्रेस नेत्यानं केलं मोठं विधान