फोटो - सोशल मीडिया
यवतमाळ : शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यवतमाळचे पालकमंत्री असलेल्या संजय राठोड यांच्या गाडीचा मध्यरात्री 2 च्या सुमारास भीषण अपघात झाला. अपघात झाला तेव्हा संजय राठोड त्यांच्या कारमध्ये नव्हते. ते दुसऱ्या एका कारने मागून येत होते. त्यांची ही कार पुढे निघाली होती. त्यामुळे संजय राठोड हे बचावले गेले.
यवतमाळमधील कोपरा या गावाजवळ हा अपघात झाला आहे. संजय राठोड यांच्या कारचा हा अपघात एवढा भीषण होता की गाडीच्या पुढच्या भागाचा पुर्णपणे चक्काचूर झाला आहे. कारने समोरच्या पिकअप व्हॅनला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. रस्त्यावरून दोन्ही गाड्या वेगाने जात असताना पिकअप व्हॅननं अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून कारची जोरात धडक बसली. या अपघातात पिकअप व्हॅन पलटी झाली. यात पिकअप व्हॅनचा चालक जखमी झाला असून अपघातानंतर त्यांना उपचारांसाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे देखील वाचा : माची परिसरातील स्फोट प्रकरणी पोलीस ॲक्शनमोडमध्ये; मृताच्या दोन भावांना अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पोहरा देवीच्या दर्शनासाठी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पालकमंत्री असलेले संजय राठोड यवतमाळहून वाशिममधील पोहरादेवी येथे दौऱ्यावर गेले होते. येताना त्यांच्या या गाडीचा अपघात झाला आहे. राठोड हे अपघात झालेल्या गाडीमधूनच प्रवास करणार होते. मात्र, ऐनवेळी ते एका पाहुण्यांच्या कारमधून निघाले. त्यामुळे कार पुढे निघाली. मागून संजय राठोड यांची कार येत होती. काही मिनिटांतच संजय राठोड प्रवास करत असलेली कार त्या ठिकाणी पोहोचली. कार बदलल्यामुळे संजय राठोड थोडक्यात बचावले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (दि.05) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान घोडबंदर येथील कासारवडवली भागात दौऱ्यावर येणार आहेत. कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. मागील आठवड्यामध्ये देखील नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र मुसळधार पावसामुळे मोदींचा हा दौरा ऐनवेळी रद्द झाला. पंतप्रधान मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर सुद्धा येणार असून पोहरा देवीचे ते दर्शन घेणार आहेत.