
mp sharad pawar reaction on Pahalgam Terrorist Attack jammu kashmir
बारामती: “आज ज्याच्या हातात सत्ता आहे, त्या भ्रष्ट सरकारच्या काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. किती आत्महत्या केल्या त्याची नोंद पोलीस स्टेशनला असते, महाराष्ट्रात 20 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचा काय गुन्हा होता. कशासाठी केल्या तर शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही.कर्जबाजारीपणा, ठिकठिकाणी अशा गोष्टी समोर येत आहेत. देशात 16 उद्योगपतींचं 18 लाख कोटींचं कर्ज माफ केलं पण शेतकऱ्यांच कर्ज माफ करून शकले नाहीत.” अशा शब्दांत टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील महायुतीचे सरकार आणि पंतप्रदान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते बारामतीत बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. तत्पुर्वी बारामतीत सभा घेत शरद पवार बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही केले.
शरद पवार म्हणाले,”लोकसभा निवणुकीची शेवटची सभा आपण तुमच्या उपस्थितीत बारामतीत घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून आपण विरोधकांना महाराष्ट्र काय चीज आहे हे दाखवून दिलं. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान. त्यांची काय इच्छा होती ते माहिती नाही. संविधानात मोठे बदल करण्यासाठी त्यांनी 300 खासदार निवडून देण्याचा नारा दिला होता. पण लोकसभा निवडणुकीत सुप्रिया ताईना मोठ्या मतांनी विजयी केलं. महाराष्ट्रात एकूण 48 खासदारांपैकी 30 खासदार निवडून दिले आणि मोदींना आवर घालण्याची तुम्ही सुरूवात केली.
‘आपल्याला आपला ‘हात’ भारी, दुसऱ्याला लाथ…’; रितेश देशमुखची लातूरच्या सभेत तुफान फटकेबाजी
आता महाराष्ट्राची निवडणूक होणार आहे. 20 तारखेला मतदान आहे. या निवडणुकीत काही महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ कार्यक्रम जाहीर केला. बहीणींचा सन्मान करायचा असेल तर माझी तक्रार नाही, पण आज बहिणींची अवस्था काय आहे, ज्यांच्या हातात सरकार आहे. त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात महिलांवर किती अत्याचार झाले याची आकडेवारी ठाऊक आहे. महाराष्ट्रात जी आकडेवारी समोर आली आहे ती 67,381. विचार करा 67 हजार महिला भगिणींवर अत्याचार होत आहेत. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे ही अवस्था आहे, असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रात महिला-मुली बेपत्ता होत आहे. राज्यात 64 हजार मुली-महिला बेपत्ता होत आहे. त्या कुठे गेल्या, त्यांचं काय रक्षण केलं. त्यांच्यासाठी काय तरतुद केली. पण ते सांगण्याची धमक त्यांच्यात नाही. आज या महिलांची गंभीर अवस्था आहे. बारामती आणि आजूबाजूचा भागात कारखानदारी आहे, उसांच पीक आहे. द्राक्षे आहेत. अनेक प्रकारची पीके आपण घेतआहोत. पण आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, हे आपण पाहत आहोत. असेही त्यांनी यावेळी नमुद केलं.
“…तर मतांचं धर्मयुद्ध करावचं लागेल”; फडणवीसांचं जनतेला विरोधकांचे नापाक इरादे गाडून टाकण्याचं आवाहन
शरद पवार म्हणाले, “आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्यांनी काय केलं,महाराष्ट्रात येणारे कारखाने गुजरातला पाठवले. टाटा कंपनी, विमाने बनवायचा कारखाना आधी महाराष्ट्रात येणार होता. पण एक दिवस हा कारखाना गुजरातला गेल्याचे आमच्या कानावर आले. वेदांता फॉक्सकॉन 10 हजार मुलांना रोजगार मिळणार होता. महाराष्ट्रात कारखाना सुरू होणार होता. त्यांना कुणी सांगितलं माहिती नाही पण त्यांनीही आपला कारखाना गुजरातला नेण्याचा निर्णय घेतला. का महाराष्ट्राची हवा वाईट आहे. महाराष्ट्रांकडे बघायचं नाही, इतर राज्यांकडे बघायचं नाही. बघायचं फक्त गुजरातकडे. टाटा एअरबस कंपनी 31900 कोटींची गुंतवणूक होती. तोही कारखाना गुजरातला हलवला. म्हणजे महाराष्ट्रात काहीच करायचं नाही. नरेंद्र मोदी हे एकट्या गुजरातचेच नाही तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. जर देशाच्या पंतप्रधानांनीच देशाचा विचार केला नाही तर अशा माणसाच्या हातात सत्ता द्यायची का, याचा विचार करावा लागेल, आणि त्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे उद्या मतदानाला जाताना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचे बटण दाबा. यावेळेला महाविकास आघाडीच्या हातात सत्ता द्यायची आहे.