कोट्यवधी रुपये खर्चूनही शेवगाव वनपर्यटन प्रकल्प तहानलेलाच! तीन अधिकाऱ्यांची वेगवेगळी उत्तरे; निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह
शेवगावच्या जनतेला आणि निसर्गप्रेमींना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी वनविभागाकडून करोडो रुपयांची उधळपट्टी करत हे वनपर्यटन केंद्र उभारण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर उतरताना याचे नियोजन पूर्णपणे फोल ठरले. प्रकल्पातील विहिरीची भूजल पातळी खालावल्याने विहिरीचे पाणी पूर्णपणे आटले आहे. नगरपालिकेकडे टँकरसाठी किंवा पाण्यासाठी वारंवार प्रयत्न केले, परंतु शहरातच पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष असल्यामुळे पालिकेनेही हात टेकले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे माणसांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य द्यावे लागत असल्याने झाडांना पाणी देणे शक्य नाही, अशी हतबलता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, नवीन बोरवेल मारली तरी तिथे पाणी लागण्याची शक्यता अत्यंत नगण्य असल्याचे त्यांचेच म्हणणे आहे. मग सवाल हा उपस्थित होतो की, पाण्याचा शाश्वत स्त्रोत माहिती नसताना करोडो रुपये खर्च करून हा प्रकल्प उभाच का केला?
Tuljabhavani Temple News : तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल करण्यासाठी जेव्हा प्रसारमाध्यमांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा तीन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून तीन परस्परविरोधी आणि हास्यास्पद दावे समोर आले. बाळकृष्ण बडे, वनरक्षक (पहिला अधिकारी सकाळी सुरू असतं) जबाबदारी झटकण्यासाठी एका अधिकाऱ्याने वनपर्यटन केंद्र सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत सुरू असते, असा अत्यंतस्याम बनाव रचला.
संदीप एकशिंगे,वनपाल (दुसरा अधिकारी दिवसभर सुरू असतं) दुसऱ्या अधिकाऱ्याने तर निर्लज्जपणाची हद्द पार करत थेट, नाही नाही, हे केंद्र दिवसभर सुरू असतं,” असे सांगत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला. धर्मवीर साल विठ्ठल,विभागीय वन अधिकारी (तिसरा अधिकारी उद्घाटनच झाले नाही!) या दोन्ही अधिकाऱ्यांचे दावे खोडून काढत खुद्द विभागीय वन अधिकारी धर्मवीर साल विठ्ठल यांनी, याचं अजून ऑफिशियल इनॉगरेशनच झालेलं नाही. पाणी नसल्यामुळे काही झाडं लावायची राहिलेली आहेत,” अशी वस्तुस्थिती समोर आणली. एकाच खात्यातील जबाबदार अधिकाऱ्यांना आपला प्रकल्प नेमका सुरू आहे की बंद, याबद्दलही एकवाक्यी उत्तर देता येत नाही, यावरून हा विभाग किती मनमानी आणि ढिसाळ पद्धतीने चालवला जात आहे, हे उघड होते.
शासकीय निधीचा असा अमानुष चुराडा करून अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री प्रकल्प उभे केले आहेत आणि आता पत्रकारांसमोर परस्परविरोधी उत्तरे देऊन आपली पाठराखण करत आहेत. दुष्काळाचा बळीचा बकरा बनवून स्वतःच्या नियोजनशून्य कारभारावर पडदा टाकण्याचा हा प्रकार शेवगावची जनता अजिबात सहन करणार नाही.
“सार्वजनिक निधीची अशी उधळपट्टी करणाऱ्या आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटारडी विधाने करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे! जर या प्रकल्पाची लवकरात लवकर दुरुस्ती करून पाण्याचा शाश्वत स्त्रोत उभा केला नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई झाली नाही, तर शेवगावच्या आक्रमक जनतेच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड दम शेवगावकरांनी दिलाय.
Ans: अपुरा पाऊस, भूजल पातळीत घट, पाणीपुरवठ्याचे अपुरे नियोजन आणि वाढती पाण्याची मागणी ही पाणीटंचाईची संभाव्य कारणे असू शकतात.
Ans: पाणीपुरवठा अपुरा असल्यास नागरिकांना पिण्याचे पाणी, घरगुती वापर आणि दैनंदिन गरजांसाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Ans: नियमित पाणीपुरवठा, जलस्रोतांचे संवर्धन, पाणीगळती रोखणे, आवश्यकतेनुसार टँकरची व्यवस्था आणि दीर्घकालीन जलव्यवस्थापन आवश्यक आहे.






