अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाअभावी खरिपाची पिके जळून गेली असून, चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
“पंचनामे कागदावरच, बांधावर कुणीच नाही!” असा संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला असला, तरी प्रत्यक्ष शेतात अधिकारी पाहणीसाठी आले नसल्याचा आरोप सहा एकर शेती असलेले शेतकरी बन्सी लिंबाजी भापकर यांनी केला आहे. सोयाबीन, उडीद आणि मूग पिकांसाठी खते, बियाणे व औषधांवर तब्बल ४० हजार रुपये खर्च करूनही पावसाअभावी पिके जळून गेली आणि हातात एकही शेंग आली नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली.