मुंबई – सध्या राज्यात सीमावाद पेटला आहे, तसेच यावरुन राजकारण देखील तापले आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा सीमावादावरुन कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी इथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. मांगुर हुपरी मार्गावर, संकेश्वर हिटणी मार्गावर, गणेशवाडी कागवाड, अप्पाचीवाडी, रायबाग तालुक्यातील गायकनवाडी आणि खानापूर येथे तपासणी नाके पोलिसांनी उभारले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरून राज्यातील वातावरण तापले असून, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली जात आहे.
[read_also content=”येत्या २४ तासात हल्ले थांबले नाहीत तर आमचा देखील संयम सुटेल, शरद पवारांचा कर्नाटक सरकारला इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/if-not-stop-attack-on-marathi-people-then-we-are-also-not-stop-for-same-sharad-pawar-warning-to-karanatak-government-351505.html”]
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषेद घेऊन राज्य सरकार कोणतीच भूमिका घेत नाहीय यावरुन टिका केली. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, सीमावादावर आता शिंदे गट आक्रमक झाला असून, याप्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा यासाठी शिंदे गटातील खासदार उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची (Amit Shah) भेट घेणार आहेत. सीमावादाचा मुद्दा कर्नाटक व महाराष्ट्रात वाद चिघळत असताना यात केंद्राने दखल देऊन हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा यासाठी शिंदे गटातील खासदार उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत.
काय आहे प्रकरण?
कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा (Belgaum, Karwar, Nipani) एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, उलट सांगलीच्या काही गावांवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे. त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला असून, आज पुन्हा एकदा बेळगावात मराठी भाषिकांवर कन्नडिकांनी हल्ला केला.