Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदी असा १२ मीटर डीपी सर्विस रस्ता विकसित करण्यात यावा, यासाठी स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत आज प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 24, 2026 | 01:39 PM
वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महापालिका निवडणूक झाल्यानंतर नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नवनिर्वाचित नगरेसेवकांडून प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३० (कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी) येथील वारजे महामार्ग चौक ते मुठा नदी असा १२ मीटर डीपी सर्विस रस्ता विकसित करण्यात यावा, यासाठी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत आज प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे.

नवनिर्वाचित नगरसेवक स्वप्निल दुधाने म्हणाले, पुणे महापालिकेचे पथ विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि संबंधित बाधित जागा पुणे मनपाला हस्तांतरीत व्हावी, याकरिता कार्यरत असणाऱ्या मालमत्ता विभागाचे उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्यासह झालेल्या या पाहणीदरम्यान रस्ता बाधित नागरिक वर्गाशी सुसंवाद साधला. वाढती लोकसंख्या आणि सम प्रमाणात वाढते शहरीकरण यासाठी रस्त्याचे महत्व नागरिकांना पटवून देताना प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

याप्रसंगी ओढयावरील पुलाचे काम काळाची गरज असून, सदर कामाचा शुभारंभ करण्याबद्दल प्रशासनाला विनंती केली आहे. याबाबत मनपाचा आराखडा तयार करण्यात आला असून, आज तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. वाढत्या लोकसंख्या आणि नागरीकरण या प्रमाणात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची जबाबदारी याबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली असून, प्रशासनानेही यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच सदर कामाचा श्रीगणेशा होईल, असा विश्वास दुधाने यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा : सदस्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; पुणे जिल्हा परिषदेत रंगरंगोटीला सुरुवात

पुणे महापालिका निवडुकीत विजय झाल्यानंतर नगरसेवक स्वप्निल दुधाने नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून दररोज प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या काही महिन्याखाली कर्वेनगरमध्ये दुधाने यांच्या पाठपुराव्यामुळे धनुर्विद्या क्रीडा संकुलाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता. आणि आता काही दिवसाखालीच कर्वेनगर परिसरात टेनिस कोर्ट अन् बास्केट बॉल कोर्टचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाल्यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Corporator dudhane has demanded the construction of warje mahamarg chowk to mutha river dp service road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी अधिकारी आणि आरोपींवर धडक कारवाई
1

Maharashtra Breaking News Today 2026: औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी अधिकारी आणि आरोपींवर धडक कारवाई

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया
2

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया

Table Tennis: १ गेम गमावला अन् मग रचला इतिहास! उपेंद्र मुळेने सोलापूरच्या अनंत कुलकर्णीला धूळ चारली
3

Table Tennis: १ गेम गमावला अन् मग रचला इतिहास! उपेंद्र मुळेने सोलापूरच्या अनंत कुलकर्णीला धूळ चारली

पुणेकरांचा नाद खुळा! आंतरराष्ट्रीय Taekwondo स्पर्धेत 15 ‘सुवर्ण’ तर…; तब्बल 28 पदकांची कमाई
4

पुणेकरांचा नाद खुळा! आंतरराष्ट्रीय Taekwondo स्पर्धेत 15 ‘सुवर्ण’ तर…; तब्बल 28 पदकांची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.