Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मग मुख्यमंत्र्यांनी काय शाळेत पाहारा देत बसायचं का..?; बदलापूर प्रकरणावर संजय गायकवाड बरळले

संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचा वाढदिवस साजरा केला होता. त्या वाढदिवसामुळेही ते चांगचेच चर्चेत आले होते.  बुलढाण्यातील जैस्तंभ चौकात मुलाच्या वाढदिवसाचा केक तलवारीनं कापून भरवला होता. त्यामुळे आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 27, 2024 | 12:13 PM
'आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी...'; संजय गायकवाड यांची इच्छा

'आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी...'; संजय गायकवाड यांची इच्छा

Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा:  बदलापूरच्या शाळेत झालेल्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरच्या नागरिकांनी थेट रेल रोको करत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यांसाठी आंदोलन केले. त्यादिवशी संपूर्ण बदलापूर रस्त्यावर उतरलं होते.त्या दिवसापासून राज्यात दररोज महिला आणि बाल  अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. पण उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीनं बंद मागे घेत ठिक-ठिकाणी तोंडाला काळे मास्क आणि काळ्या फिती बांधून आंदोलन केलं.

राज्यभरातून अशा घटना सातत्याने समोर येत असतानाच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. बदलापूर घटनेवर बोलताना, मुख्यमंत्र्यांनी काय शाळेत जाऊन पाहारा देत बसायचं का,  असा सवाल उपस्थित केला आहे.त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

हेदेखील वाचा: शिवरायांचा पुतळ्याचे कॉन्ट्रॅक्टर जयदीप आपटे, केतन पाटीलवर गुन्हा दाखल

बदलापूर घटनेनंतर बुलढाणा जिल्ह्यातही अशीच घटना समोर आली. या घटनेवरून संजय गायकवाडांना विचारले असता गायकवाड म्हणाले, “मी कालचं आंदोलन पाहिले, सगळे पक्ष त्यावर थयथयाट करत होते. ही एक प्रवृत्ती असते. पण ज्या हरामखोंना त्या लेकीचं वय  कळत नाही. पण हे सगळे लोक हे सरकारने केलं म्हणून ओरडत होते. पण मग आता मुख्यमंत्र्यांनी काय शाळेत जाऊन पाहारा द्यायचा का, पोलिस अधीक्षक आरोपीच्या घरी जाऊन बसणार का? की आरोपी सांगणार मी बलात्कार करणार आहे, मला पकडायला या” जेव्हा  अशा घटना घडतात त्यावेळी पोलीस यंत्रणाच काम करते, काही घटनांमध्ये सीबीआय काम करते. पण आरोपीला सोडले जात नाही. त्यामुळे अशा घटनांवर राजकारण करण्यापेक्षा त्या आरोपीला शिक्षा होणं  महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. पण त्यावर राजकारण करण्यापेक्षा अशा नराधमांना शिक्षा कशी मिळेल, हे पाहिलं पाहिजे.

संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशीच वक्तव्य केली आहेत. धमक्या देणे, मारहाण करणे अशा प्रकरणांमुळे ते कायम चर्चेत असतात. पण बदलापूर प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होते असतानाच संजय गायकवाडांनीही असे अशोभनीय विधान केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे काय कारवाई करणार, याकडेसर्वांचे लक्ष लागले आहेत

हेदेखील वाचा: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला बसला दणका; कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचा वाढदिवस साजरा केला होता. त्या वाढदिवसामुळेही ते चांगचेच चर्चेत आले होते.  बुलढाण्यातील जैस्तंभ चौकात मुलाच्या वाढदिवसाचा केक तलवारीनं कापून भरवला होता. त्यामुळे आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.

Web Title: Shinde sena leader sanjay gaikwad made an offensive comment on badlapur school case nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 12:13 PM

Topics:  

  • Badlapur case
  • Buldhana politics
  • Sanjay Gaikwad

संबंधित बातम्या

Sanjay Gaikwad News: दीड कोटींची डिफेंडर कार कोणत्या कामातील कमिशन? संजय गायकवाडांचे स्पष्टीकरण
1

Sanjay Gaikwad News: दीड कोटींची डिफेंडर कार कोणत्या कामातील कमिशन? संजय गायकवाडांचे स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.