Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Shivendrasinhraje Bhosale News: कार्यक्रमातील आणखी एक लक्षवेधी मुद्दा म्हणजे विधान परिषद आमदार धैर्यशील कदम आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्याबाबत मंत्री भोसले यांनी केलेले भाष्य. दोघांमध्ये पूर्वी राजकीय मतभेद आणि स्पर्धा होती

  • By anuradha sagar
Updated On: Sep 19, 2026 | 01:58 PM
Shivendrasinhraje Bhosale, Umbraj Rest House,

Shivendrasinhraje Bhosale, Umbraj Rest House,

Follow Us
Follow Us:
  • उंब्रज येथील शासकीय विश्रामगृहाचा ५ कोटी ८३ लाख रुपयांचा भूमिपूजन सोहळा संपन्न.
  • सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची राजकीय फटकेबाजी आणि सूचक भाष्य.
  • मसूर आणि पाली पुलांच्या कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश.
Umbraj Government Rest House : कराड येथील बहुप्रतीक्षित शासकीय विश्रामगृहाच्या भूमिपूजन सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाषणाने विकासकामासोबतच कराड उत्तरच्या राजकारणालाही चांगलीच रंगत आणली. आपल्या मिश्कील, कोपरखळी मारणाऱ्या शैलीत त्यांनी स्थानिक राजकीय घडामोडींवर केलेल्या सूचक भाष्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चेला उधाण आले. Shivendrasinhraje Bhosale Speaks At Umbraj Rest House Bhumi Pujan In Karad

उंब्रज येथील शासकीय विश्रामगृहाच्या तळमजल्यासाठी सुमारे २ कोटी २५ लाख रुपये, तर वरील मजल्यासाठी सुमारे ३ कोटी ५८ लाख रुपये, अशी एकूण सुमारे ५ कोटी ८३ लाख रुपयांची मंजुरी आहे. सुमारे ४५०० चौरस फुटांचा तळमजला आणि एकूण १० हजार चौरस फुटांचे बांधकाम असून, हे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पामध्ये निवास, बैठक, स्वागत, भोजन तसेच अन्य आवश्यक सुविधा प्रस्तावित आहेत.

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी

मसूर व पाली येथील पुलांबाबत अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दरम्यान

कार्यक्रमात मसूर आणि पाळी येथील पुलांच्या प्रश्नाकडेही मंत्री भोसले यांनी लक्ष वेधले. या दोन्ही ठिकाणच्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रश्नांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

“दोघांना संधी मिळाली, आता एकदिलाने विकास करा”

कार्यक्रमातील आणखी एक लक्षवेधी मुद्दा म्हणजे विधान परिषद आमदार धैर्यशील कदम आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्याबाबत मंत्री भोसले यांनी केलेले भाष्य. दोघांमध्ये पूर्वी राजकीय मतभेद आणि स्पर्धा होती. मात्र, आता दोघेही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनाही राजकीय संधी दिली आहे, त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने कराड उत्तरचा विकास करावा, असा सल्ला मंत्री भोसले यांनी दिल्याचे कार्यक्रमस्थळी चर्चेत राहिले. दोघांमधील समन्वयाबाबत यापूर्वीही राजकीय पातळीवर चर्चा झाल्याचे वृत्त आले आहे.

Gauri Visarjan 2026: गौरी विसर्जनाआधी हे नक्की वाचा! ‘या’ 7 गोष्टींची विशेष काळजी घ्या

“अजिंक्यताराला ऊस घाला, थोडं आमच्याकडेही लक्ष द्या…”

आपल्या मिश्कील शैलीत मंत्री भोसले यांनी “अजिंक्यतारा कारखान्याला ऊस घाला, थोडं आमच्याकडेही लक्ष द्या. मी भरभरून मदत करतोय, थोडी आम्हालाही मदत करा. आम्ही ऊस बिल द्यायला कधीही कमी पडणार नाही,” असे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्याला ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

उमेदवारीपासून स्थानिक राजकारणापर्यंत सूचक भाष्य

मसूर जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे, शेवटच्या क्षणी बदललेली परिस्थिती आणि उंब्रज जिल्हा परिषद गटातील उमेदवारीचा पेच याबाबतही मंत्री भोसले यांनी आपल्या भाषणातून मतदारांची मानसिकता आणि निवडणुकीतील बदलती समीकरणे यावर सूचक भाष्य केले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्यांची चर्चा रंगली.
विशेष म्हणजे कराड उत्तरमध्ये यापूर्वी घोरपडे आणि कदम यांच्यातील राजकीय समन्वयाचा विषय चर्चेत राहिला असून, दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका यापूर्वीही सार्वजनिकरीत्या मांडली आहे.

विश्रामगृहाचे भूमिपूजन, पुलांच्या प्रश्नांवर तातडीच्या सूचना आणि त्यासोबत कराड उत्तरच्या राजकीय समीकरणांवर झालेली मिश्कील टोलेबाजी यामुळे उंब्रजचा हा कार्यक्रम विकासकामासोबतच राजकीय चर्चेचाही केंद्रबिंदू ठरला.

 

Web Title: Shivendrasinhraje bhosale speech at umbraj rest house bhumi pujan karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Marathi News
  • Satara News
  • Shivendrasinhraje Bhosale

संबंधित बातम्या

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च
1

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन
2

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश
3

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव  देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?
4

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.