Shivsna Dasra Melava 2025: दरवर्षीप्रमाणे दसरामेळावा निमित्ताने शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर एक्स अकाऊंटवरून हा संबंधित व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. “सोनं विचारांचं देऊ घेऊ मनसोक्त, भगवे विचार आणि भगवंच रक्त…” असे या व्हिडीओला शीर्षक देण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या या टीझरची सुरुवात ही ‘लांडग्यांच्या कळपातून बाहेर आला वाघ, जळून झाले खाक अशी शिवसैनिकाची आग, खेचून आणलाय परत धनुष्यबाणाचा मान, उंच होती उंच राहिल भगव्याची शान’ अशी होत आहे. दरवर्षीप्रमाणे मुंबईतील आझाद मैदानावर येत्या २ ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्ताने शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे सायंकाळी सहा वाजता या सभेला सुरूवात होईल या मेळाव्याला राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, चाहते आणि नेते उपस्थित राहणार आहे.
मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना आगामी मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव शिंदे काय बोलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमात शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले जाणारे मार्गदर्शन ही मोठी चर्चा ठरली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यातील शिंदे यांचे विधान पक्षाच्या रणनीतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेते या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.
1 ऑक्टोबरपासून बदलणार 10 मोठे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!
मुंबईत आझाद मैदानात होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी स्टेजची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. हा आझाद मैदानातील तिसरा मेळावा ठरणार असून, या मैदानाची क्षमता सुमारे २०,००० लोकांची आहे. शिंदे गटाकडून इतके लोक उपस्थित राहतील यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
यापूर्वी शिंदे गटाचा पहिला मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला होता, तर त्यानंतरचे दोन मेळावे आझाद मैदानात घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भगवी शाल अंगावर घेतलेली पोस्टर्सवर झळकणारी प्रतिमा चर्चेचा विषय ठरली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा हा मेळावा पक्षासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्वाची भूमिका मांडू शकतात, ज्यामुळे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साह निर्माण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.