भाजप नेते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांना पाकिस्तानचे प्रवक्ते म्हटले आहे (फोटो - सोशल मीडिया)
BJP Politics : मुंबई : आशिया कप 2025 संपला असून भारताला विजेतेपद मिळाले. पाकिस्तानी टीमला धुळ चाखवत भारताने किताब मिळवला खरा पण ट्रॉफीवरुन मोठी नाट्यमय घडामोड झाली. भारतीय संघाने पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. मात्र भारत पाकिस्तान (IND VS PAK)हा सामना होऊच नये अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाकडून मांडण्यात आली. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी सरकारवर यावरुन जोरदार निशाणा साधला. दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) हे पाकिस्तानचे प्रवक्ते असल्याची गंभीर टीका भाजप नेत्यांनी केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी भारतीय क्रिकेट संघावर देखील टीका केली. यावरुन भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी जोरदार निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, जनाब संजय राऊत यांनी भाजपवर टीका करण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सेवा करणं, मदत करणं यासाठी सरकार कटीबद्ध आहे. त्यांना डायरेकट खात्यात पैसे दिले जात आहेत. आज कॅबिनेटची बैठक आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार भक्कमपणे उभं आहे. संजय राऊत यांनी नाकाने कांदे सोलणे बंद करावे. आपण बांधावर जाऊन किती मदत केली याचा विचार करावा. उद्धव ठाकरे बांधावर गेले होते. पण त्यांना कोरडे उमाळे दाटून आले. शेतकऱ्यांना एका दमडीची मदत उबाठा गटाकडून किंवा संजय राऊत यांनी केलेली नाही, अशी घणाघाती टीका नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊतांवर केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, भाजपचे कार्यकर्ते शेतकऱ्यांसोबत उभे आहेत. उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या उबाठआ गटाने एक रुपयाची मदत शेतकऱ्यांना केलेली नाही. त्यामुळे मराठवाड्याच्या पूरग्रस्तांच्या प्रश्नावर बोलण्याचा संजय राऊत यांना अधिकार नाही. निकष न पाळता मदत करणार हे मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं आहे. राज्य सरकार सजग आहे. अभूतपूर्व संकट आहे. आजपर्यंतच्या पिढ्यांनी असं संकट बघितलं नव्हतं. जमीन खरडून गेली आहे, या परिस्थिती कुठलही निकष न पाळता शेतकऱ्यांना मदत करण्याच काम राज्य सरकार करत आहे. विशेष अधिवेशनाची मागणी करतायत. पण त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात हा खर्च करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत पोहोचवण गरजेच आहे” असे देखील मत नवनाथ बन यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे भाजप नेते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांनी भारतीय क्रिकेट संघावर टीका केल्याने राग व्यक्त केला. बन म्हणाले की, खरतर भारतीय क्रिकेटपटूंनी त्यांचं सर्व मानधन इंडियन आर्मीला दिलं. पाकिस्तानच्या क्रिकेटपटुंनी का दिलं याचा जाब संजय राऊत यांनी पाकिस्तानला विचारावा. संजय राऊत पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करत आहेत. भारताच्या विजयानंतर संजय राऊत यांनी साधं टि्वट केलं नाही. त्यांनी विजयानंतर सेलीब्रेशन करायला पाहिजे होतं. पाकिस्तान जिंकला असता, तर संजय राऊत यांना जास्त आनंद झाला असता” असा खोचक टोला भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी लगावला आहे.