teacher convicted of sexually abusing minors role of teacher as guru in indian culture supervision of special court nrvb
मयुर फडके, मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये (Indian Culture) शिक्षकाला (Teacher) गुरूचे स्थान दिले जाते (Position Of Guru) जे देवासमान मानले जाते. याचा अर्थ शिक्षकाने आपल्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काळजीवाहू आणि मार्गदर्शक पालकाप्रमाणे सांभाळावे, असे अपेक्षित असते (A teacher is expected to look after his students like a caring and guiding parent). परंतु या खटल्यातील शिक्षकांने चार अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण (Sexual Abuse Of Four Minor Girls) केल्याचे सिद्ध होत असल्याचे नमूद करून त्यास दोषी ठरवत विशेष न्यायालयाने शिक्षकास पाच वर्षांची शिक्षा ठोठावली.
मुलांना गणित आणि विज्ञान शिकवणाऱ्या चारुदत्त बोरोले (३५) या शिक्षकाने नोव्हेंबर २०१५ ते मार्च २०१६ च्या दरम्यान पाचवीत आणि सहावीत शिकणाऱ्या चार अल्पवयीन मुलींवर शाळेच्या आवारात लैंगिक अत्याचार केले होते. त्यावर नुकतीच विशेष पोक्सो न्यायालयात विशेष न्यायाधीश नाझेरा शेख यांच्यासमोर सुनावणी झाली.
आजही आपला समाजात स्त्री शिक्षणाविषयी पुरेसा जागरूक आणि गांभीर्याने घेतले जात नाही. या पार्श्वभूमीवर अशा घटनांमुळे पालकांच्या मनात मुलींना शाळेत पाठवण्याबाबत धार्ती निर्माण होते. अशा घटनांमुळे मुलींच्या शिक्षणाच्या संधीवरही विपरीत परिणाम होतो. याप्रकरणात पीडितांनी धैर्य एकवटून घडलेल्या प्रकाराची तक्रार केल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
भारतीय संस्कृतीत शिक्षकाला गुरूचे स्थान दिले जाते आणि गुरु या पदाला देवाइतकंच अनन्यसाधारण महत्त्वं दिले आहे. (‘गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा’) असेही म्हटले जाते. ब्रम्हा विष्णु आणि महेश या देवतांप्रमाणे शिक्षक ब्रम्हदेव म्हणून मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करतो. त्याचे ज्ञानात रुपांतर व्हावे, असे प्रयत्न करतो आणि विदयार्थ्याला सक्षम, शिस्तबद्ध आणि ज्ञानाने परिपूर्ण व्यक्ती बनवतो.
विष्णुप्रमाणे हाच शिक्षक ज्ञान आणि शिक्षणाची जोपासना करायला लावतो आणि शंकराप्रमाणे विद्यार्थ्यांच्या चंचलवृत्तीचा नाश करतो. त्यामुळे एक सावध पालक ज्याप्रमाणे आपल्या मुलांची काळजी घेतो तशी विद्यार्थ्यांची काळजी घेणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे. मात्र, या खटल्यात शिक्षक या पदाचा आणि अधिकारांचा गैरफायदा घेऊन आरोपीने अल्पवयीन पीडितांवर लैंगिक अत्याचार केल्याचे स्पष्ट होत आहे, असे शेवटी न्यायालयाने निकालपत्रात नमूद करून आरोपीला दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा ठोठावली.