Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पदवीधरांचे प्रश्न सभागृहात न मांडणाऱ्या आमदाराला घरी बसवा, इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन

आज इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये केवळ निवडणूक आल्यावर फिरणाऱ्या आमदाराच्या विरोधात मतदान करा असे आवाहन करण्यात आले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 20, 2024 | 02:44 PM
पदवीधरांचे प्रश्न सभागृहात न मांडणाऱ्या आमदाराला घरी बसवा, इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली : आज कणकवलीमध्ये इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे. गेले १२ वर्ष पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधित्व निरंजन डावखरे करीत आहेत. केवळ ६ वर्षांनी निवडणूक आली की स्वतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे त्यांचे दर्शन होते. त्यामुळे बेरोजगारीचे प्रश्न, शैक्षणिक प्रश्न आणि शाळा, महाविद्यालयांचे प्रश्न सभागृहात न मांडणाऱ्या खासदाराच्या विरोधात पदवीधरांनी मतदान केले पाहिजे. केवळ निवडणूक आल्यावर फिरणाऱ्या आमदारांच्या विरोधात मतदान करा. पदवीधरांचे प्रश्न सभागृहात न मांडणाऱ्या आमदाराला घरी बसवा असे आवाहन इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

या पत्रकार परिषदेच्या वेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर,विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेस पदवीधर निवडणूक सह प्रभारी प्रवीण ठाकूर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, राष्ट्रवादीचे निलेश गोवेकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेबुलकर, अनिकेत दहिबावकर, सिद्धेश राणे, सरचिटणीस प्रवीण वरुणकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

काय म्हणाले काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख

काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक लागली आहे. पदवीधरांना रोजगार मिळत नाही. देशात गेल्या काही वर्षात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. भरती प्रक्रिया केली जाते, त्यामध्ये कोट्यवधी रुपयांची शासन गोळा करीत आहेत. ही रक्कम बेरोजगार असलेल्या लोकांकडून गोळा केली जात आहे. त्यामुळे कोकणात पदवीधरांना संधी देण्यासाठी आपला हक्काचा माणूस आवश्यक आहे. गेल्या १२ वर्षात निरंजन डावखरे यांनी लोकांच्या हिताचा विषय मांडला नाही. निरंजन डावखरे पदवीधर निवडणूक लागली की ६ वर्षाने पुन्हा येतात. पदवीधरांना आवाज म्हणून रमेश किर यांना उमेदवारी दिली आहे. तळकोकणात पहिल्यांदा संधी मिळाली आहे.

काय म्हणाले जिल्हाध्यक्ष संदेश पारकर

शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, कोकण पदवीधर मतदार निवडणूक आहे. यामध्ये रमेश कीर हे आमचे उमेदवार आहेत, संपूर्ण राज्यात परिवर्तनाची लाट आहे. आपला हक्काचा आमदार निवडून द्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा सेनेच्यावतीने मोठी मतदार नोंदणी केली आहे.

शिवसेना विधानसभा सतीश सावंत म्हणाले की, २६ जूनला निवडणूक होणार आहे. गेले १२ वर्षे निरंजन डावखरे यांची कामगिरी असमाधानकारक आहे. त्यांनी बेरोजगारीवर, शैक्षणिक संस्थाचे प्रश्न किंवा पदवीधरांचे प्रश्न घेऊन कुठलाही लढा उभारला नाही, कुठल्याही आंदोलनात सहभाग घेतला नाही. बेरोजगार लोक आहेत, त्यांनी विरोधात मतदान करा. जिल्ह्यात चांगली मतदार नोंदणी केली आहे. धनलक्ष्मी दर्शन घ्या, मात्र बळी पडू नका, मतदान मात्र रमेश किर यांना करा, सरकारच्या धोरणाचा निषेध करा, असे आवाहन त्यांनी केले.

आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर म्हणाले, कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक महत्वाची आहे. यावेळी तरुण मतदारांचा आकडा वाढलेला आहे. नोंदणीमध्ये वाढ असल्याने रमेश किर यांना चांगले मतदान होईल. गेल्या १२ वर्षात डावखरे हे फक्त निवडणूक आली की दिसतात, त्यासाठी पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार असावा.

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले, आम्ही युवा सेनेच्यावतीने मतदार नोंदणी केली आहे. निवडून गेल्यानंतर किती वेळा डावखरे जिल्ह्यात आले आहेत? लोक विचारणा करत होते? पदवीधर आमदार कोण आहेत? निष्क्रिय आमदार आहे, बेरोजगारीचा प्रश्नावर बोलत नाहीत, त्यांना आता राखण्याची वेळ आली आहे.

Web Title: Sit the mla who does not raise the issues of graduates in the house at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2024 | 02:44 PM

Topics:  

  • kankavali

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.