Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू तर पाच कामगार जखमी

वानवडी परिसरात भोरी समाजाच्या सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम सुरु असताना पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळून (Slab Collapsed) पाच मजूर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 02, 2022 | 07:28 PM
सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू तर पाच कामगार जखमी
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : वानवडी परिसरात भोरी समाजाच्या सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम सुरु असताना पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळून (Slab Collapsed) पाच मजूर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना खालून दिलेला सपोर्ट निसटला आणि हा स्लॅब कोसळला. यामुळे खाली व स्लॅब टाकण्याचे काम करणारे कामगार जखमी झाले. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच येरवडा परिसरात एका बहुमजली इमारतीचे काम सुरू असताना लोखंडी सांगडा मंजूरावर कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाला होता. तर, सहाजण जखमी झाले होते.

राम नरेश पटेल (वय 45, रा. वानवडी) असे मृत्यू झालेल्या मजूराचे नाव आहे. तर छत्रसिंग धूमकेती (वय 28), बरसिंग परटा (वय 37), संदिपकुमार उलके (वय 18), दिपचंद मराबी (वय 27) अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी परिसरातील अलंकार हॉलसमोर व एसआरपीएफ दोनचे गेट शेजारी भोरी समाजाच्या सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. ठेकेदाराला हे स्लॅब टाकण्याचे काम देण्यात आले होते. त्यानुसार हे बांधकाम सुरू होते. या सांस्कृतिक इमारतीचे काम सुरू आहे. त्याच्या पहिल्या मजल्याचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. आज पहिल्याचा स्लॅब टाकण्यात येत होता. स्लॅब टाकण्यासाठी लाकडांचा त्याला सपोर्ट देण्यात आला होता. काही मजूर खाली काम करत होते. तर काहीजण स्लॅब भरण्याचे काम करत होते.

यादरम्यान, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक खालून स्लॅबला दिलेला सपोर्ट निसटला आणि सुरू असणारा स्लॅब कोसळला गेला. त्यात पाच कामगरा अडकले गेले. तत्काळ या घटनेची माहिती अग्निशमन दलाला आणि वानवडी पोलीसांना देण्यात आली. त्यानंतर हडपसर अग्निशम दल व वानवडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत नागरिकांनी तीन कामगारांना बाहेर काढून रुग्णालयात पाठविले होते.

अग्निशमनाच्या जवानांनी दोन कामगारांना बाहेर काढले व त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यात दोघांची प्रकृती चिंतानजक होती. उपचार सुरू असतानाच एका कामगाराचा गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अधिकार्यांनी देखील येथे धाव घेतली होती. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.

बांधकाम अनधिकृत..?

भोरी समाजाकडून सुरू असणारे बांधकाम बेकायदेशीर असल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली. त्यामुळे त्याला परवानगी होती का तसेच परवानगी असेल तर त्यानुसारच बांधकाम सुरू होते का, असे प्रश्न समोर आले आहेत. तसेच, या बांधकामाबाबत न्यायालयात वाद सुरू असल्याचेही येथील नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या घटनेची तसेच बांधकामाबाबत चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. बांधकाम करण्यासाठी ड्रेनेज लाईन तोडल्या गेल्या आहेत. तर काही वळविण्यात आल्या आहेत.

Web Title: Slab collapsed while construction of the cultural hall was underway one died and five workers were injured in pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2022 | 07:28 PM

Topics:  

  • slab collapsed

संबंधित बातम्या

Nerul Slab Collapsed: नवी मुंबई हादरली! नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून मोठा अपघात; रहिवाशांमध्ये घबराट
1

Nerul Slab Collapsed: नवी मुंबई हादरली! नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून मोठा अपघात; रहिवाशांमध्ये घबराट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.