सोलापूर : न्यायालयीन कामकाजाची माहिती अधिकारी व कर्मचारी यांना असायला हवी. प्रशासकीय कामकाजाचे दृष्टीने महत्वाचे आहे. न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा वेळेत करा, असे जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी (CEO Dilip Swami) यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज न्यायालयीन कामकाजाची माहिती होण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) चंचल पाटील, कार्यकारी अभियंता दीपक कोळी, ऍड. व्ही. बी. मराठे, ऍड. आर व्ही. दामले, ऍड. संतोष न्हावकर, ऍड. रामचंद्र भोसले, ऍड. डी एस देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. न्यायालयाने प्रकरणे तडजोडीने मिटविणेसाठी जिल्हा न्यायालयास विनंती करून लोक न्यायालयाचे आयोजन करा, असे आवाहन सीईओ दिलीप स्वामी यांनी केले.
विधी कक्षाची आवश्यकता : ऍड. मराठे
जिल्हा परिषद ही संस्था मोठी आहे. विधी कक्षाची आवश्यकता आहे. विधी कक्ष पुन्हा सुरू झाल्यामुळे अनेक न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा होण्यास मदत झाली आहे.
दोन महिन्यात २५ प्रकरणे मार्गी : चंचल पाटील
विधी कक्ष सुरू झाल्यामुळे २ महिन्यात ३० पैकी २५ प्रकरणे मार्गी लागणेस मदत झाली आहे. प्रशिक्षणाची आवश्यकता होती. जर कर्मचारी यांना न्यायालयीन कामकाजाची माहिती झाल्यास वेळेत निपटारा होण्यास मदत होणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत झाली, असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी सांगितले.
हा कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अधीक्षक अनिल जगताप, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, गजानन कुलकर्णी, होटकर, कृष्णा अंधारात, रेवणसिद्ध म्हेत्रे, इस्माईल सय्यद यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विधी कक्षाचे राजेश देशपांडे यांनी केले. प्रारंभी दिलीप स्वामी यांचे व मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. अविनाश गोडसे यांनी आभार मानले.