Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी खास मोबाईल अँप तयार करावे, निवासासह सर्व व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन करावे – रविंद्र चव्हाण

दोन वर्षांच्या खंडानंतर अधिवेशन होत आहे. या पार्श्वभूमीवर निवास व्यवस्था तसेच अन्य सर्व व्यवस्था अद्ययावत करावी. ते सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. आवश्यक तेथे डागडुजी करावी. वीज, पाणी, स्वच्छता आदी सुविधा तत्काळ उपलब्ध होतील, असे नियोजन करावे. त्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावे. तसेच शीघ्र प्रतिसाद दल कार्यान्वित करावे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 06, 2022 | 06:05 PM
नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी खास मोबाईल अँप तयार करावे, निवासासह सर्व व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन करावे – रविंद्र चव्हाण
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : ‘कोविड- १९’ मुळे नागपूर येथे दोन वर्षांच्या खंडानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. हिवाळी अधिवेशनासाठी येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रसिध्दि माध्यमांचे प्रतिनिधी आदी सर्वांची निवासाची व्यवस्था पुरविण्याचे सूक्ष्म आणि अचूकपणे नियोजन करावे. त्याचप्रमाणे कोणाचीही कुठलीही गैरसोय होणार नाही. त्याचप्रमाणे हिवाळी अधिवेशनच्या काळात केलेल्या सर्व व्यवस्थेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मोबाईल अॅप तयार करावे असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिले.

मंत्रालयातील परिषद सभागृहात आज सकाळी विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन २०२२ च्या प्रस्तावित निवास व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, आहार व्यवस्था, वाय-फाय व्यवस्था, प्रसिध्दीमाध्यमांची व्यवस्था आदींचा सविस्तर आढावा चव्हाण यांनी घेतला. यावेळी अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो. ना. बागूल, मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव सुभाष गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश नंदनवार, कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री चव्हाण यांनी सांगितले, दोन वर्षांच्या खंडानंतर अधिवेशन होत आहे. या पार्श्वभूमीवर निवास व्यवस्था तसेच अन्य सर्व व्यवस्था अद्ययावत करावी. ते सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. आवश्यक तेथे डागडुजी करावी. वीज, पाणी, स्वच्छता आदी सुविधा तत्काळ उपलब्ध होतील, असे नियोजन करावे. त्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावे. तसेच शीघ्र प्रतिसाद दल कार्यान्वित करावे. निवास व्यवस्थेचे नियोजन करताना अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदींच्या चालकांची व्यवस्था तसेच आवश्यक तेथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. स्वच्छतेसाठी तैनात कर्मचाऱ्यांची माहिती दर्शनी फलकांवर लावावी. नियुक्त मनुष्यबळ योग्य गणवेशात राहील याची खबरदारी संबंधितांनी यंत्रणांनी घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

हिवाळी अधिवेशनाच्या काळात करण्यात येणा-या सर्व सोयी -सुविधांची एकत्रिक माहिती असणारे मोबाईल अॅप तयार करावे जेणेकरून त्या अॅपवर सर्व माहिती उपलब्ध होऊ शकेल. असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. अपर मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनीही विविध सूचना केल्या. अधीक्षक अभियंता नंदनवार, कार्यकारी अभियंता कुचेवार यांनी निवास व्यवस्थेबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

Web Title: Special mobile app should be created for the nagpur winter session minister ravindra chavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2022 | 06:05 PM

Topics:  

  • Nagpur Winter session
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

काँग्रेस नेते वडेट्टीवारांचे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनीच केलं कौतुक; राजकीय चर्चांना उधाण
1

काँग्रेस नेते वडेट्टीवारांचे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनीच केलं कौतुक; राजकीय चर्चांना उधाण

सोलापूर शहर भाजपमध्ये धुसफूस; कार्यकारिणी निवड जाहीर करताच ‘या’ नेत्याने दिला राजीनामा
2

सोलापूर शहर भाजपमध्ये धुसफूस; कार्यकारिणी निवड जाहीर करताच ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

पुणे भाजपची कार्यकारिणी जाहीर; सरचिटणीसपदी साळेगावकर तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी मोहोळ
3

पुणे भाजपची कार्यकारिणी जाहीर; सरचिटणीसपदी साळेगावकर तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी मोहोळ

Kalyan News: ‘या’ इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास लागणार मार्गी, रवींद्र चव्हाण यांची माहिती
4

Kalyan News: ‘या’ इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास लागणार मार्गी, रवींद्र चव्हाण यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.