Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिकिटासाठी एकदाही दिल्ली, मुंबई वारीन करता उमेदवारी; शाहू महाराजांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर संभाजीराजेंची खास पोस्ट

  • By युवराज भगत
Updated On: Mar 23, 2024 | 07:46 PM
chhatrapati sambhajiraje

chhatrapati sambhajiraje

Follow Us
Close
Follow Us:

Kolhapur News : कोल्हापुरातून शाहू महाराजांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर संभाजीराजेंची खास पोस्ट केली आहे. एकदाही मुंबई, दिल्ली वारी न करता उमेदवारी मिळाली, असे संभाजीराजेंनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) कोल्हापुरात (Kolhapur) शाहू महाराजांना (Shahu Maharaj) लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मविआने कोल्हापूरची जागा काँग्रेसला देत शाह महाराजांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

अभिनंदन बाबा…
गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या "वाकीघोल" या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला… pic.twitter.com/x4hOQDAuiY
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 23, 2024
सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि राजर्षी शाहू महाराजांचे पणतू आणि वारसदार असलेले श्रीमंत शाहू महाराज छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
शाहू महाराजांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर संभाजीराजेंची खास पोस्ट
संभाजीराजे छत्रपती यांनी बाबांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ट्विटर म्हणजेच एक्स पोस्टमध्ये त्यांनी शाहू महाराजांचं अभिनंजन केलं आहे. तिकीटासाठी एकदाही मुंबई, दिल्लीला न जाता शाहू महाराजांना लोकसभेची उमेदवारी तिकीट मिळाली. त्यांच्या जनसेवेमुळे त्यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
संभाजीराजे छत्रपतींनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
अभिनंदन बाबा…
गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या “वाकीघोल” या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेले. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातले काम… पुढे दिलेला शब्द…. आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी नाही
खरेतर तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी न करता, केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धी पासून अलिप्त राहत जे जनसेवेचे कार्य केले आहे, राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचेच हे प्रमाण आहे. कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे.
काँग्रेसकडून शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीतून महाराष्ट्रातील 7 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांची ही पहिलीच यादी आहे. कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Web Title: Special post of shahu maharaj chhatrapati after shahu maharaj chhatrapatis candidature was fixed from kolhapur nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2024 | 07:13 PM

Topics:  

  • Sambhaji Raje
  • Sambhajiraje Chhatrapati

संबंधित बातम्या

PRADA ने केली कोल्हापूरी चप्पलची चोरी? श्रेय न दिल्याने संभाजीराजे छत्रपती भडकले, थेट केली ‘ही’ मोठी मागणी
1

PRADA ने केली कोल्हापूरी चप्पलची चोरी? श्रेय न दिल्याने संभाजीराजे छत्रपती भडकले, थेट केली ‘ही’ मोठी मागणी

Shivarajyabhishek sohola 2025 : रायगडावर शिवराज्याभिषेक देदीप्यमान सोहळा दिमाखात पार
2

Shivarajyabhishek sohola 2025 : रायगडावर शिवराज्याभिषेक देदीप्यमान सोहळा दिमाखात पार

Kille Raigadh: मोठी बातमी! रायगड किल्ल्यावर ‘यंत्रराज’चा शोध; दुर्गराजाच्या विज्ञानाधिष्ठित बांधकामाचा पुरावा
3

Kille Raigadh: मोठी बातमी! रायगड किल्ल्यावर ‘यंत्रराज’चा शोध; दुर्गराजाच्या विज्ञानाधिष्ठित बांधकामाचा पुरावा

‘स्वराज्य पक्ष’ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्टच सांगितलं
4

‘स्वराज्य पक्ष’ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.