Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एस एस राजामौलींच्या आरआरआरमुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतीवीराच्या शौर्याची गोष्ट सर्वांसमोर आली

अल्लूरी सिताराम राजू हे नाव आज घराघरात पोहोचले आहे. एस एस राजामौली यांचा भव्य सिनेमा आरआरआरमुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील या क्रांतीवीराच्या शौर्याची गोष्ट सर्वांसमोर आली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनली आहे.

  • By Vanita Kamble
Updated On: May 17, 2022 | 07:24 PM
rrr movie

rrr movie

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अल्लूरी सिताराम राजू हे नाव आज घराघरात पोहोचले आहे. एस एस राजामौली यांचा भव्य सिनेमा आरआरआरमुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील या क्रांतीवीराच्या शौर्याची गोष्ट सर्वांसमोर आली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनली आहे. सध्याच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील वन्य जमातींच्या हक्कांसाठी आपल्या आयुष्याचे बलिदान देणा-या या थोर स्वातंत्र्यसेनानीची पुण्यतिथी १० मे रोजी असते. दुर्दैवाने सरता काळ आणि बदलत्या पिढीबरोबर राजूसारखे शेकडो स्वातंत्र्य सैनिक विस्मृतीच्या अंधारात नाहीसे झाले आहेत तर काहींच्या बलिदानाच्या कहाण्या कधी उजेडातच आलेल्या नाहीत. आपल्या जुलमी शासनकर्त्यांच्या नजरेला नजर देत स्वतंत्र भारताचा जयघोष करणारे हे शूर सर्वसामान्यांसाठी अपरिचित राहून जावेत या गोष्टीचे नवल वाटल्याशिवाय राहत नाही(SS Rajamouli’s RRR brings to the fore the story of heroism of pre-independence revolutionaries).

आपले ज्ञान केवळ प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिकांपर्यंतच सीमित राहणार असेल तर आपल्या देशाच्या परंपरेचा रास्त अभिमान बाळगला जाणार नाही. आपल्या चालू आणि भावी पिढ्यांना विस्मृतीत गेलेल्या अशा अनेक क्रांतीकारकांच्या शौर्याची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांच्याठायी असलेल्या धगधगत्या राष्ट्रभक्तीविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लि. (एएएचएल) कडून भारतीय स्वातंत्र्यगाथेच्या सर्वज्ञात इतिहासाचा भाग नसलेल्या अशाच काही शहीद वीरांच्या स्मृती जागविल्या जात आहेत.

ही मोहीम भारत सरकारने स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने आणि स्वातंत्र्यलढ्याचा दैदिप्यमान इतिहास साजरा करण्यासाठी सुरू केलेल्या आझादी का अमृत महोत्सव या मोहिमेचा भाग आहे. यंदा भारताच्‍या ७५व्‍या स्‍वातंत्र्य दिनाला साजरे करण्‍यानिमित्त १५ ऑगस्‍ट २०२१ रोजी या मोहिमेची सुरूवात झाली. सुमारे २०० वर्षांच्या संघर्षानंतर १९४७ मध्ये मध्यरात्री भारताला एक नवा जन्म आणि स्वातंत्र्य मिळाले.

होय, केवळ स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन किंवा इतर कोणत्याही राष्ट्रीय सुटीच्या दिवशी नव्हे तर आज आणि दर दिवशी आपण आपल्या स्वतंत्र भारतासाठी बलिदान देणा-या वीरांची आठवण ठेवली पाहिजे. आझादी का अमृत महोत्सव आपल्या नव्या आणि जुन्या पिढ्यांना केवळ स्वातंत्र्यसैनिकांचीच नव्हे तर स्वातंत्र लढ्याचीही आठवण करून देण्याची ही सुवर्ण संधी आहे.

मुंबई, अहमदाबाद, लखनऊ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि थिरुवनंतपुरम अशा ७ एअरपोर्टसचे व्यवस्थापन सांभाळणारे एएएचएल या वीरांना श्रद्धांजली म्हणून पब्लिक अनाउन्समेंट (पीए) यंत्रणा आणि फ्लाइट इन्फॉर्मेशन डिस्प्ले (एफआयडी) स्क्रीन्सच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये या वीरांविषयी, त्यांच्या विस्मृतीत गेलेल्या चळवळींविषयी आणि त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंगांविषयी जागरुकता निर्माण करत आहे.

सर्व भारतीय विमानतळांनी आपल्या पीए आणि एफआयडी यंत्रणांच्या माध्यमातून अनाम स्वातंत्र्यवीरांच्या जन्मदिनी/पुण्यतिथीला किंवा त्यांच्या आयुष्यातील एखाद्या लक्षणीय दिवशी प्री-रेकॉर्डेड ऑडिओ किंवा डिस्प्ले संदेश प्रसारित करावा अशा सूचना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.

मे महिना हा यादृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण या महिन्यामध्ये १८५७ चे बंड म्हणून ओळखल्या जाणा-या एका मोठ्या स्वातंत्र्य चळवळीला १६५ वर्षे पूर्ण होत आहेत. या महिन्यामध्ये एएएचएलद्वारे पुरुषोत्तम काकोडकर, प्रीतीलता वड्डैदार, अल्लुरी सिताराम राजू, दुर्गाबाई देशमुख, करतार सिंग सरभा आणि बिश्नी देवी शाह अशा सहा क्रांतीकारकांविषयी जनजागृती करणार आहे.

प्रवाशांकडून या मोहिमेची वाखाणणी केली जात आहे व त्यायोगे देशभक्तीची भावना त्यांच्या मनी जागरुक होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करण्यामध्ये ही मोहीम यशस्वी झाली आहे. लखनऊ विमानतळावर अलीकडेच केलेल्या एक सर्वेक्षणामध्ये ८० टक्क्यांहून अधिक व्यक्तींनी या मोहिमेला ‘एक्सलंट’ रेटिंग दिले. ‘युवा पिढीला स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देणारा एक चांगला उपक्रम..”, “एक चांगले पाऊल…”, “आपल्या स्वातंत्र लढ्याविषयीची सर्वसामान्यांचे ज्ञान समृद्ध करणारा उपक्रम…” अशा शब्दांत त्यांनी या मोहिमेचे कौतुक केले आहे.

[read_also content=”लग्नानंतर वधू-वराने स्वत:ला पेटवून घेतलं आणि…. पाहा भयानक व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/bride-and-groom-set-themselves-on-fire-nrvk-280519.html”]

[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]

[read_also content=”क महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]

Web Title: Ss rajamoulis rrr brings to the fore the story of heroism of pre independence revolutionaries nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2022 | 07:24 PM

Topics:  

  • RRR

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.