Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटी तिकीट दरवाढीचा सर्वसामान्यांना बसतोय फटका; जवळच्या अंतरासाठी दुचाकीला दिलं जातंय प्राधान्य

एका व्यक्तीला एसटीला सुमारे 50 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी साध्या गाडीने 92 रुपये, शिवशाही 133 रूपये, तर शिवाईला 125 रूपये आणि 145 रुपये मोजावे लागत आहेत. तर दुचाकीने एवढ्याच अंतरासाठी 105 रुपयांत दोघांना प्रवास होत आहे

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 02, 2025 | 01:20 PM
एसटी तिकीट दरवाढीचा सर्वसामान्यांना बसतोय फटका; जवळच्या अंतरासाठी दुचाकीला दिलं जातंय प्राधान्य

एसटी तिकीट दरवाढीचा सर्वसामान्यांना बसतोय फटका; जवळच्या अंतरासाठी दुचाकीला दिलं जातंय प्राधान्य

Follow Us
Close
Follow Us:

भंडारा : एसटी महामंडळाने नुकतीच लालपरीच्या प्रवास भाड्यात 15 टक्के दरवाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ बसत आहे. एसटीने वाढविलेल्या प्रवास भाड्यामुळे महागाईवर मात करण्यासाठी आता अनेकांनी दुचाकीचा मार्ग अवलंबला आहे. एसटीने एका व्यक्तीला एक किलोमीटर प्रवास करण्यासाठी 1.85 ते 2.83 रूपये मोजावे लागत आहेत. तर एवढ्याच प्रवासासाठी दुचाकीने प्रवास करण्यासाठी दोन व्यक्तींना केवळ 2 रुपये खर्च येतो.

ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलतीमुळे तसा विशेष फरक पडणार नाही. मात्र, इतरांना काही प्रमाणात हा भार सोसावा लागत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने सर्वसामान्य प्रवाशी लालपरीलाच पसंती देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर अनेकांनी दुचाकीचा प्रवास टाळून एसटीने प्रवास सुरू केले होते. नुकतेच एसटीने 15 टक्के दरवाढ लागू केल्याने विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक पुन्हा दुचाकीकडे वळले आहेत. दुचाकीवर दोघांना प्रवास करता येत असल्याने खर्चात मोठ्या प्रमाणांवर बचत होत आहे.

एका व्यक्तीला एसटीला सुमारे 50 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी साध्या गाडीने 92 रुपये, शिवशाही 133 रूपये, तर शिवाईला 125 रूपये आणि 145 रुपये मोजावे लागत आहेत. तर दुचाकीने एवढ्याच अंतरासाठी 105 रुपयांत दोघांना प्रवास होत आहे. म्हणजे एका व्यक्तीच्या वाट्याला 50 ते 55 रुपये खर्च येणार आहे. याच अंतरासाठी मात्र, एसटीला दुप्पट रक्कम द्यावी लागत असल्याने अनेकांनी शेअरिंग दुचाकीचा प्रर्याय निवडला असल्याचे दिसून येत आहे.

सुरक्षेसाठी एसटीलाच पसंती

एसटीचा प्रवास जरी महागला असला तरी अनेक जण आजही एसटीलाच पसंती देत आहेत. कडक उन्हाळा आणि पावसाळ्यात दुचाकीवर प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी आणि असुरक्षित प्रवासामुळे दरवाढ झाली असली तरी सुरक्षित प्रवासासाठी एसटीलाच प्राधान्य देत असल्याचे ग्रामीण भागातील पालांदूर-भंडारा, पालांदूर-लाखनी असे रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.

दुचाकीला दिलं जातंय प्राधान्य

आम्ही दोघे मित्र लाखनी येथे एका खासगी प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणासाठी नियमित दुचाकीने घोडेड़झरी ते लाखनी प्रवास करतो. बसच्या वेळा नियोजित नसल्याने आणि बसने अधिक पैसे लागतात. मी आणि माझा मित्र दुचाकीवरील प्रवासाला प्राधान्य देतो. यात पैसाही वाचतो आणि वेळही वाचतो.

– निखिल महेंद्र गोस्वामी, घोडेझरी.

Web Title: St bus ticket fare increased difficulties infront of common man nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • Maharashtra Govenment

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.