मुंबई : अनाधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार (State government) आक्रमक झाले असून, मुंबई तसेच राज्यात होणारे अतिक्रमण तसेच अनाधिकृत बांधकामप्रकरणी (unauthorized construction) राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुंबईतील मालाडच्या (Malad) मढमधील (Madh) १२ अनाधिकृत स्टुडिओवर (Studio) कारवाई करण्याचे राज्य सरकारचे आदेश दिले आहेत. याआधी इथे भाजपा नेते किरीट सोमय्यांनी (kirit somayya) या जागेची पाहणी केली होती. तसेच पाहणीनंतर या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी सोमय्यांनी राज्य सरकारकडे केली होती.
[read_also content=”कामाची बातमी! राज्यातील लिपिकांची सर्व रिक्त पदे भरणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/all-clerks-post-recruiting-by-mpsc-important-decision-in-state-cabinet-meeting-328438.html”]
दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख यांच्यावर आरोप केले आहेत, जर केंद्र सरकारने ही जागा अनाधिकृत घोषित केली आहे तर, तत्कालीन मंत्र्यांनी या बांधकामास परवानगी कशी दिली असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळं आता राज्य सरकार सुद्धा अँक्शन मोडमध्ये आले असून, मुंबईतील मालाडच्या मढमधील १२ अनाधिकृत स्टुडिओवर कारवाई करण्याचे राज्य सरकारचे आदेश दिले आहेत.