पुणे : पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य ।। वर्षांखालील खुल्या व मुलींच्या गटातील फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत राज्यभरातून 170 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा श्री गणेश सभागृह, कर्वे रोड येथे 28 ते 30 जुलै 2023 या कालावधीत होणार आहे.
30,000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे उपाध्यक्ष आश्विन त्रिमल आणि पीडीसीसीचे सदस्य हर्निश राजा यांनी सांगितले की, ही स्पर्धा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेखाली होत असून, एकूण 30,000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच, ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने 9 फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. यामध्ये ।। वर्षांखालील खुल्या गटात 120 खेळाडू, तर मुलींच्या गटात 50खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.
या जिल्ह्यांमधून स्पर्धक सहभागी
स्पर्धेत पुणे, मुंबई सिटी, मुंबई उपनगर, यवतमाळ, नागपूर, रायगड, अमरावती, चंद्रपूर, अहमदनगर, सोलापूर, पालघर, ठाणे, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, अकोला, जालना, बीड, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली या शहरातून 170 खेळाडू सहभागी झाले असल्याचे आश्विन त्रिमल यांनी सांगितले.
स्पर्धेत मानांकित खेळाडूंचा सहभाग
स्पर्धेतील मानांकित खेळाडूंमध्ये खुल्या गटात शौनक बदोले (नागपुर, 1581), अविरत चौहान ( पुणे, 1436), आर्यन वाघमारे (ठाणे. 1394). विराज राणे (मुंबई उपनगर 1391), अविक अग्रवाल (पुणे, 1384) यांनी, तर मुलींच्या गटात अव्वल मानांकित वेदिका पालनागपुर 1456), माईशा परवेझ (मुंबई उपनगर 1311). अन्वी हिरडे (नागपुर, 1200), स्वधा दातिर ( यवतमाळ, 1186), त्वेशा जैन (मुंबई शहर. 1167) यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी या स्पर्धेचा उपयोग
स्पर्धेतील खुल्या व मुलींच्या गटातील अव्वल दोन खेळाडूंची निवड आगामी आंध्र प्रदेश येथे 1 ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार असून हे खेळाडू या स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे हर्निश राजा यांनी नमूद केले. निरंजन गोडबोले, दीप्ती शिदोरे, प्रकाश कुंटे यावेळी उपस्थित होते.
Web Title: State of maharashtra 170 players participated in fide rating chess tournament in under age open and girls category nryb