Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Mayor Cup Chess : मुंबई महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेला आजपासून सुरुवात; १५६ शालेय बुद्धिबळपटूंमध्ये रंगणार चुरस!

Mumbai Mayor Cup Chess : एलआयसी-मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धेला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. नऊ वयोगटांतील 156 शालेय बुद्धिबळपटू विजेतेपदासाठी खेळणार आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 23, 2026 | 04:11 PM
Mumbai Mayor Cup Chess : मुंबई महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेला आजपासून सुरुवात; १५६ शालेय बुद्धिबळपटूंमध्ये रंगणार चुरस!

Mumbai Mayor Cup Chess : मुंबई महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेला आजपासून सुरुवात; १५६ शालेय बुद्धिबळपटूंमध्ये रंगणार चुरस!

Follow Us
Follow Us:
  • 9 वयोगटांत रंगणार स्पर्धा
  • फिडे मानांकित खेळाडूंचाही सहभाग
  • महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन
मुंबईतील शालेय बुद्धिबळपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) यांच्या सहपुरस्कृत एलआयसी-मुंबई महापौर चषक (Mumbai Mayor Cup Chess) 14 वर्षांखालील शालेय बुद्धिबळ स्पर्धेला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 156 शालेय बुद्धिबळपटू सहभागी होणार असून, विविध नऊ वयोगटांतील विजेतेपदासाठी त्यांच्यात चुरस रंगणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, नगरसेवक महादेव शिवगण, नगरसेवक रोहिदास लोखंडे आणि क्रीडापटू गोविंदराव मोहिते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

9 वयोगटांत रंगणार स्पर्धा

मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना, सीबीईयूएम आणि आरएमएमएस यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. परळ येथील आरएमएमएसच्या वातानुकूलित सभागृहात स्पर्धेचे सामने खेळवले जातील. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 वर्षांखालील अशा 9 वयोगटांत ही स्पर्धा होणार आहे.

Asian Para Games : नितेश-थुलसिमथीची रौप्यपदकाला गवसणी; पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताची दमदार कामगिरी!

फिडे मानांकित खेळाडूंचाही सहभाग

स्पर्धेत फिडे मानांकित कनिष्ठ बुद्धिबळपटूंसह अनेक होतकरू खेळाडू सहभागी होणार आहेत. साम्यक कुळकर्णी, रिशी अग्रवाल, आर्यन उपरकर, अथर्व मुळीक, अद्वैत लोंढे, कार्तिकेय सावंत, स्मित लोके, सार्थ लोके, अर्थम तोते, रिहान कुळकर्णी, आयांश पाटील आणि कृष्णाम गोयल यांसारखे खेळाडू विजेतेपदासाठी प्रतिस्पर्ध्यांना शह-प्रतिशह देण्यासाठी सज्ज आहेत.

स्पर्धेतील प्रत्येक वयोगटात 15 आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यामुळे विविध वयोगटांतील खेळाडूंना आपल्या कामगिरीच्या जोरावर पारितोषिक मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Indian Cricket : भारतीय क्रिकेटला अलविदा! सब्बिनेनी मेघनाची निवृत्ती; म्हणाली, ‘क्रिकेट कायम हृदयात राहील’

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन

स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर इच्छुक महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क पूर्वतयारी मार्गदर्शन उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चेंबूरनाका येथील महापालिका शाळेत आयोजित मार्गदर्शन उपक्रमाला नगरसेवक महादेव शिवगण, बुद्धिबळ प्रशिक्षक डॉ. सिद्धेश नर, डॉ. इकबाल शेख, डॉ. जितेंद्र लिंबकर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेपूर्वी बुद्धिबळातील डावपेच समजून घेण्याची आणि स्पर्धात्मक खेळासाठी तयारी करण्याची संधी मिळाली.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: एलआयसी-मुंबई महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धा कधी सुरू होणार आहे?

    Ans: स्पर्धेला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

  • Que: स्पर्धेत किती खेळाडू सहभागी होणार आहेत?

    Ans: या स्पर्धेत 156 शालेय बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत.

  • Que: स्पर्धेचे आयोजन कोणी केले आहे?

    Ans: आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एलआयसी या स्पर्धेचा सहपुरस्कर्ता आहे.

Web Title: Mumbai mayor cup chess school tournament 156 players rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Chess Championship
  • Maharashtra Chess Association
  • Student

संबंधित बातम्या

अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; मनमाडमध्ये हळहळ
1

अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; मनमाडमध्ये हळहळ

AI in Education: एआय मुलांचा मेंदू हुशार बनवतंय की आळशी? अभ्यासात एआय वापरताना ‘हा’ ८०/२० नियम एकदा वापरा!
2

AI in Education: एआय मुलांचा मेंदू हुशार बनवतंय की आळशी? अभ्यासात एआय वापरताना ‘हा’ ८०/२० नियम एकदा वापरा!

Project Umang : वर्गाबाहेरचं शिक्षण, स्वप्नांना नवी दिशा! वाड्यातील 1,800 विद्यार्थ्यांसाठी ‘प्रोजेक्ट उमंग’
3

Project Umang : वर्गाबाहेरचं शिक्षण, स्वप्नांना नवी दिशा! वाड्यातील 1,800 विद्यार्थ्यांसाठी ‘प्रोजेक्ट उमंग’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.