Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दगडापासून वाळू योजनेला आता उद्योगाचा दर्जा; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

काही वाळू माफियांनी कारनामे चालू ठेवण्यासाठी आणि शासकीय कर्मचार्‍यांवर दहशत बसविण्यासाठी गुंडांच्या टोळ्या पाळलेल्या दिसून येतात. शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 08, 2025 | 12:04 PM
दगडापासून वाळू योजनेला आता उद्योगाचा दर्जा; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

दगडापासून वाळू योजनेला आता उद्योगाचा दर्जा; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

पुणे / दीपक मुनोत : राज्यातील वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी, दगडापासून वाळू तयार करण्यासाठी ʻएम-सँडʼ ही योजना राबवण्यात येत आहे. मात्र, उत्पादनवाढीसाठी या योजनेला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार असल्याची माहिती, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ʻनवराष्ट्रʼला दिली.

राज्यातील विविध नद्यांच्या पात्रात वाळू माफिया टोळ्यांकडून खुलेआम बिनदिक्कतपणे वाळूउपसा सुरू असतो. रात्री दहानंतर ते पहाटे पाच वाजेपर्यंत जेसीबी, पोकलेन व यांत्रिक बोटीच्यांही सहाय्याने बेकायदा वाळू उपसा केला जातो. वाळू लिलावांवर बंदी असूनही हे गैरप्रकार सर्रास सुरू आहेत. वाळू माफियांनी बेसुमार उपसा केल्याने नदी पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. पर्यावरणाचेही प्रचंड नुकसान होते. तशातच महसूल विभागाच्या हलगर्जीपणामुळे या वाळूतस्करांच्या टोळ्यांना अप्रत्यक्ष मदत होते. त्यातून हप्तेवसुलीद्वारे भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी थेट विधीमंडळातही होत असतात यावर उपाय म्हणून, राज्य सरकारने वाळूविक्रीचे लिलाव थांबवले आणि दगडाचा चुरा करून ती वाळू वापरण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. या वाळूलाच ʻएम- सँडʼ म्हटले जाते.

ʻएम-सँडʼला प्रोत्साहन देण्याचे धोरण असले तरी मागणीच्या तुलनेत या वाळूचा पुरवठा खूपच कमी आहे. त्यामुळे वाळूतस्करांचे फावते. राज्याचे वेगाने होणारे शहरीकरण, परिणामी वाढती बांधकामे, अन्य प्रकल्पांची कामे यांमुळे वाळूला प्रचंड मागणी आहे. मात्र, एम सँडचे उत्पादन तुलनेने खर्चिक व नफा कमी देणारे असल्याने त्यात गुंतवणूकीस कोणी स्वारस्य दाखवत नाही.

करांमध्ये सवलती

यावर उपाय म्हणून, राज्य सरकारने ʻएम – सँडʼ उत्पादनाला औद्योगिक दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे, मध्यम आणि लघू उद्योगांसाठी असणाऱ्या बहुतांश सर्व सवलती मिळू शकतील. त्यात प्रामुख्याने, भांडवली गुंतवणुकीवरील अनुदान (सबसिडी), सवलतीच्या दरातील वीज पुरवठा, मागास भागात उद्योग उभारल्याने मिळणाऱ्या टॅक्स हॉलीडेसह अन्य विविध सवलती, गरजेनुसार विकसित भूखंड इतकेच नव्हे तर मुद्रांक शुल्क, जीएसटी सवलत, अशा विविध कर सवलतींचा लाभ मिळेल. परिणामी, ʻएम सँडʼ उत्पादनासाठी उद्योजक पुढे यावेत, या हेतूने या व्यवसायाला औद्योगिक दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

राज्याचे नागरिकरण 60 टक्क्यांपुढे गेल्याने तसेच मोठ मोठे औद्योगिक प्रकल्प राज्यात येत असल्याने, आता विलंब करून चालणार नाही, असेही प्रस्तावात जाणिवपूर्वक नमूद करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या वतीने हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या निर्णयासाठी तयार करण्यात आला आहे. त्यासाठी, उद्योग, अर्थ, जलसंपत्ती, पर्यावरण, पाटबंधारे, आदी खात्यातील अधिकाऱ्यांनी सहकार्य केले आहे.

वाळू तस्करी व गुन्हेगारीला ब्रेक

वाळू तस्करीतील भरमसाट पैसा आणि राजकीय पाठबळामुळे तसेच बिन भांडवली धंदा असल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती या धंद्यात घुसल्या. माफियांनी दशकभरात शेकडो शासकीय अधिकार्‍यांवर आणि कर्मचार्‍यांवर प्राणघातक हल्ले केले आहेत. त्या-त्या भागातील राजकीय नेतेच वाळू तस्करीमध्ये गुंतल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून बहुतांश वाळू तस्करांना राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरून पाठबळ मिळते.

दुसरीकडे, महसूल विभाग अवैध वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगळे उपाय योजते. मध्यंतरी सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी ते इंदापूर तालुक्यातील माळवाडी दरम्यान अवैध वाळू उपसा करणाऱ्या ११ बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उडवून नष्ट करण्यात आल्या. सोलापूर व पुणे जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.

अधिकाऱ्यांना मारहाण

काही वाळू माफियांनी कारनामे चालू ठेवण्यासाठी आणि शासकीय कर्मचार्‍यांवर दहशत बसविण्यासाठी गुंडांच्या टोळ्या पाळलेल्या दिसून येतात. शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

अंबडच्या तहसीलदारांना मारहाण

हिंगोलीच्या प्रांताधिकार्‍यांवर हल्ला, नाशिक जिल्ह्यात दोन तहसीलदारांना कार्यालयात घुसून मारहाण, एरंडोलच्या प्रांताधिकार्‍यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, जालन्यात पोलिस अधिकार्‍याचे दोन्ही पाय जायबंदी, जळगावच्या उपजिल्हाधिकार्‍यांवर जीवघेणा हल्ला, आजवर शेकडो तलाठ्यांना मारहाण तसेच पत्रकारांवर प्राणघातक हल्ले झाले आहेत. ʻएम सँडʼ ला उद्योगाचा दर्जा दिल्यानंतर या गैरप्रकारांना आळा बसू शकतो.

Web Title: Stone to sand project now has industry status nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…; बचतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
1

Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…; बचतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra MLC Oath Ceremony: निलम गोऱ्हे, बच्चू कडूंसह १० जणांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
2

Maharashtra MLC Oath Ceremony: निलम गोऱ्हे, बच्चू कडूंसह १० जणांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

Anupam Kher : ‘जिथे राजने सिमरनचा हात धरला…’ त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचले अनुपम खेर; महाराष्ट्र सरकारकडे केली खास मागणी
3

Anupam Kher : ‘जिथे राजने सिमरनचा हात धरला…’ त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचले अनुपम खेर; महाराष्ट्र सरकारकडे केली खास मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.