Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन

Buldhana Digital Life Certificate Scheme: बुलढाण्यात निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला अभियान राबविण्यात येत आहे. ‘जीवन प्रमाण’ सुविधेद्वारे ३० नोव्हेंबरपूर्वी घरबसल्या दाखला सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 14, 2026 | 08:56 PM
Buldhana Digital Life Certificate Scheme

Buldhana Digital Life Certificate Scheme

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात निवृत्तीवेतनधारकांसाठी विशेष अभियान
  • घरबसल्या हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा
  • ३० नोव्हेंबर अंतिम मुदत
बुलढाणा: जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी डिजीटल हयातीचा दाखला सादर करण्याच्या विशेष अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत असून, सर्व पात्र निवृत्ती वेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले. (Buldhana)

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका! कंटेनरची एकापाठोपाठ १६ कारला धडक; अनेक जखमी

या अभियानांतर्गत निवृत्ती वेतनधारकांना कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहता डिजीटल पद्धतीने हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. त्यासाठी ‘जीवन प्रमाण’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या सहजपणे हयातीचा दाखला सादर करणे शक्य होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवृत्ती वेतनधारकांकडे आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक, बँक खाते तपशील तसेच आवश्यक निवृत्ती वेतनविषयक माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे.

बँकेत येणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना मोबाइलद्वारे घरबसल्या फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून हयातीचा दाखला सादर करता येतो, याबाबत बैंक कर्मचाऱ्यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे. तसेच अभियानाच्या कालावधीत कोणत्याही निवृत्ती वेतनधारकाची गैरसोय होणार नाही, याची दक्षता सर्व बँक शाखा व्यवस्थापकांनी घ्यावी, असेही सूचित करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी ३० नोव्हेंबरपूर्वी डिजीटल हयातीचा दाखला सादर करून या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

माहितीपत्रके व फलक ठळकपणे प्रदर्शित करावेत

अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बँक शाखेत निवृत्ती वेतनधारकांसाठी स्वतंत्र कक्ष अथवा खिडकी स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बँकांच्या दर्शनी भागात, सूचना फलक आणि एटीएम केंद्रांवर डिजीटल हयातीचा दाखला विशेष अभियानासंदर्भातील माहितीपत्रके व फलक ठळकपणे प्रदर्शित करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Buldhana: कपाशी उत्पादक शेतकऱ्यांवर संकट! दोन वेच्यांतच पीक संपलं, खर्च वसूल करणंही कठीण

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुलढाण्यात कोणासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे?

    Ans: बुलढाणा जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

  • Que: डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याची अंतिम मुदत काय?

    Ans: निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी डिजिटल हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.

  • Que: हयातीचा दाखला कोणत्या सुविधेद्वारे सादर करता येतो?

    Ans: निवृत्तीवेतनधारकांना केंद्र सरकारच्या ‘जीवन प्रमाण’ या डिजिटल सुविधेद्वारे हयातीचा दाखला सादर करता येतो.

Web Title: Buldhana scheme digital life certificate pensioners jeevan pramaan campaign pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 08:53 PM

Topics:  

  • buldhana news
  • digital
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका! कंटेनरची एकापाठोपाठ  १६ कारला धडक; अनेक जखमी
1

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका! कंटेनरची एकापाठोपाठ १६ कारला धडक; अनेक जखमी

Khamgaon: निराधार महिलांसाठी मोठा दिलासा! आता वयाच्या पुराव्यासाठी आधारकार्ड ग्राह्य; गणेश चौकसे यांच्या पाठपुराव्याला यश
2

Khamgaon: निराधार महिलांसाठी मोठा दिलासा! आता वयाच्या पुराव्यासाठी आधारकार्ड ग्राह्य; गणेश चौकसे यांच्या पाठपुराव्याला यश

Buldhana Accident: मलकापूर-बुलढाणा मार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टरखाली दबून दोन तरुणांचा दुर्दैवी अंत, पोलिसांत गुन्हा दाखल
3

Buldhana Accident: मलकापूर-बुलढाणा मार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टरखाली दबून दोन तरुणांचा दुर्दैवी अंत, पोलिसांत गुन्हा दाखल

Buldhana: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार करणार मदत; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचे आश्वासन
4

Buldhana: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार करणार मदत; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.