Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News: कारंजातील अचानक डायलिसिस केंद्र बंद! निधीअभावी मोफत सेवा ठप्प; रुग्णांच्या अडचणीत भर

Karanja Maha Dialysis Scheme Center Closed: निधीअभावी आणि थकीत देयकांमुळे कारंजा ग्रामीण रुग्णालयातील मोफत महा डायलिसिस केंद्राची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 11, 2026 | 05:02 PM
Karanja Maha Dialysis Scheme Center Closed

Karanja Maha Dialysis Scheme Center Closed

Follow Us
Follow Us:
  • निधी रखडला, डायलिसिस थांबले
  • कारंजातील किडनी रुग्णांसमोर उपचारांचा प्रश्न
  • मोफत केंद्राची सेवा अचानक बंद
कारंजा: कारंजा ग्रामीण रुग्णालयात सूरू असलेल्या महा डायलिसिस केंद्राद्वारे पुरवली जाणारी मोफत डायलिसिस सेवा तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली. ही सेवा अचानक थांबवण्यात आल्यामुळे नियमित डायलिसिसवर असणाऱ्या अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. महा डायलिसिस प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात एकूण १०८ महा डायलिसिस केंद्र कार्यरत आहे.

Baramati News : दहा हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळल्या अजितदादांच्या आठवणी; बारामतीकरांचे डोळे पाणावले

वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट आणि कारंजा ग्रामीण रुग्णालयात हे केंद्र उपलब्ध आहे. कारंजा येथे महा डायलिसिस केंद्र फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरू झाले. या केंद्रात ५४ रुग्ण नोंदणीकृत असून २५ रुग्णांना नियमित डायलिसिस सेवा चालू आहे. आतापर्यंत ३००० डायलिसिस झाल्याचे येथील डायलिसिस केंद्रातील कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

वरुड, मोर्शी पासूनचे रुग्ण केंद्रामध्ये कारंजा घाडगे येथील डायलिसिसच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी येतात. मात्र केंद्र बंद होणार असल्याच्या सूचना आरोग्य विभागाला आल्याने मंगळवारी जिल्हा शल्य चिकित्सक राजसिंग पवार यांनी कारंजा येथील केंद्राला भेट दिली. सध्या स्थितीत प्रकल्पासाठी आवश्यक निधी शासनाकडून प्राप्त न झाल्यामुळे तसेच देयके थकीत असल्यामुळे हा प्रकल्प सध्या गंभीर आर्थिक स्थितीत सापडला असल्याचे सांगितले जात आहे. निधी अभावी प्रकल्प व्यवस्थापनाला महा डायलिसिस केंद्राचे कामकाज तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे प्रकल्प व्यवस्थापकांनी नियमित रुग्णांना सूचना देऊन कळविले.

खासगीतील खर्च न परवडणारा

माझ्या वडिलांचे आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावे लागते. शासकीय केंद्रावर अचानक सेवा बंद असल्याचे सांगण्यात आले. ऐनवेळी खासगी रुग्णालयात जाणे आणि एवढा खर्च परवडणारा नाही. प्रशासनाने ही सेवा तत्काळ पूर्ववत करावी, अशी मागणी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर रुग्णाच्या नातेवाईकाने ‘नवराष्ट्र ‘कडे केली आहे.

वर्ध्याचे, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. राजसिंग पवार म्हणाले की, कारंजा येथील डायलिसिस केंद्र प्रकल्प व्यवस्थापकाकडून काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणीमुळे बंद होणार असल्याच्या सूचना प्राप्त होताच आपण मंगळवारी या केंद्राला भेट दिली. या डायलिसिस केंद्रामधील डायलिसिस सेवा घेणाऱ्या सर्व २५ रुग्णाची व्यवस्था सेवाग्राम रुग्णालयातील डायलिसिस केंद्रामध्ये केली आहे. यापुढे रुग्णांनी सेवाग्राम येथील रुग्णालयामध्ये असलेल्या डायलिसिस केंद्रामध्ये सेवा घ्यावी.

FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: कारंजातील महा डायलिसिस केंद्र का बंद करण्यात आले?

    Ans: शासकीय निधी न मिळाल्याने आणि देयके थकीत असल्यामुळे केंद्राची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली.

  • Que: कारंजा डायलिसिस केंद्रात किती रुग्ण नियमित उपचार घेत होते?

    Ans: या केंद्रात ५४ रुग्ण नोंदणीकृत असून, त्यापैकी २५ रुग्ण नियमित डायलिसिस घेत होते.

  • Que: कारंजातील महा डायलिसिस केंद्र कधी सुरू झाले?

    Ans: हे केंद्र फेब्रुवारी २०२५ मध्ये कारंजा ग्रामीण रुग्णालयात सुरू झाले.

Web Title: Wardha karanja dialysis center closed funding crisis pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Maharashtra Health Department
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा! १.५१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा
1

Wardha News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा! १.५१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुक्यात, गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा
2

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुक्यात, गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांगांसाठी १६ योजना जाहीर, २१८ कोटींचा निधी उपलब्ध
3

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांगांसाठी १६ योजना जाहीर, २१८ कोटींचा निधी उपलब्ध

Marathwada Water Grid Project : मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार? २० हजार कोटींचा वॉटर ग्रीड प्रकल्प, फडणवीसांचे निर्देश
4

Marathwada Water Grid Project : मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार? २० हजार कोटींचा वॉटर ग्रीड प्रकल्प, फडणवीसांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.